घरमुंबईमहिलांच्या सुरक्षिततेसाठी ‘संजीवनी’चा प्रसाद

महिलांच्या सुरक्षिततेसाठी ‘संजीवनी’चा प्रसाद

Subscribe

मुंबई  : गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्र राज्य सरकारच्या माहितीनुसार तब्बल २६००० मुली आणि महिला हरवल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. यामध्ये मुंबईतील तब्बल २२००० महिलांचा समावेश आहे. यातील जवळपास ३०० मुलींचे वय १८ वर्षांहून कमी आहे.

या पार्श्वभूमीवर महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेसाठी मुंबईतील डिलाईल रोड येथील पंचगंगा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने ‘संजीवनी’ नावाचा एक नवीन अ‍ॅप तयार केला आहे. यात संकटप्रसंगी एखाद्या महिलेने क्लिक केल्यावर जवळच्या पोलीस स्थानकात, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल या तिघांनाही ती महिला संकटात असल्याचा एक मेसेज जाणार आहे. या सोबत असाच मेसेज तिच्या जवळच्या काही ठराविक नातेवाइकांनादेखील जाणार आहे. मंडळाच्या सुमित पाटील या तरुण मुलाने करविंग कोड या कंपनीच्या साहाय्याने हा अनोखा अ‍ॅप तयार केला आहे. महत्त्वाचे म्हणजे हे अ‍ॅप वापरण्यासाठी इंटरनेटची गरज नाही.

- Advertisement -

अ‍ॅपचे वैशिष्ठ्य

  • संकटाच्या वेळी एकाच वेळी अनेक लोकांना एका क्लिकद्वारे मेसेज करता येतो.
  • हा अ‍ॅप वापरताना इंटरनेटची गरज नाही.
  • अ‍ॅप प्ले स्टोअरवर नि:शुल्क उपलब्ध आहे.
  • या अ‍ॅपमध्ये अ‍ॅड केलेले आपले जवळचे नातेवाईक आपले लाईव्ह लोकेशन पाहू शकतात.
  • जर का चुकून संकटात असल्याचा चुकीचा मेसेज गेला असेल तर नातेवाइकांना पुन्हा मेसेज करून तुम्ही सुरक्षित असल्याचा मेसेज पाठवू शकता.
  • संकटाच्या वेळी पोलीस ठाणे, रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि तुमच्या जवळच्या नातेवाईकांना तुमच्या लोकेशनसह सर्व माहिती उपलब्ध होऊ शकणार आहे.

वेगळे डिव्हाइसदेखील उपलब्ध

अनेकदा महिलांना संकटाच्या वेळेस मोबाइल पटकन सापडत नाही. या करिता एक वेगळे डिव्हाइसही उपलब्ध आहे. त्यावरून एका क्लिकवर पोलीस, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलासह इतर नातेवाईकांना ती महिला संकटात असल्याचा मेसेज पोहचेल. महत्वाची बाब म्हणजे हे डिव्हाइस महिला मंगळसूत्र किंवा आयडी कार्डप्रमाणे गळ्यात घालू शकतात.

अनेकदा संकटाच्या वेळेस महिलांना काहीच सुचत नाही. त्या खूप घाबरलेल्या असतात. यासाठी त्यांना या अ‍ॅपचा फायदा होणार आहे. याचसोबत अशी वाईट कृत्ये करणार्‍यांना सुबुद्धी मिळो ही बाप्पाच्या चरणी प्रार्थना.
– सुमीत पाटील

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -