घरगणेशोत्सव २०१९चाकरमान्यांची परतीच्या प्रवासासाठी एसटीला पसंती; १७७ बसेसचे आरक्षण झाले फुल!

चाकरमान्यांची परतीच्या प्रवासासाठी एसटीला पसंती; १७७ बसेसचे आरक्षण झाले फुल!

Subscribe

७५१ एसटी बसेसपैंकी १७७ बसेसंच आरक्षण फुल झाले आहे.

गणपती उत्सवासाठी कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांना कोरोनाची चाचणी अनिवार्य केल्याने चाकरमान्यांनी एसटीकडे पाठ फिरवली आहे. मात्र, आता परतीच्या प्रवासाला चाकरमान्यांनी एसटीला पंसती दिली आहे. २३ ऑगस्ट ते २ सप्टेंबरपर्यंत ७५१ बसेस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध केल्या आहेत. त्यापैकी ७१ बसेसच ग्रुप बुकिंग (गट आरक्षण)झाले असून १०६ बसेसचे १००% व्यक्तिगत आरक्षण झाले आहे. उर्वरित ५७४ बसेसचे अंशतः आरक्षण झाले आहे.

७५१ बसेस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध 

गौरी गणपतीच्या उत्सवासाठी ६ ऑगस्ट ते १२ ऑगस्टपर्यंत कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांसाठी एसटीने मुंबई, ठाणे, पालघर येथील प्रमुख बसस्थानकावरून बसेस सुरू केल्या आहेत. ६ ऑगस्ट ते १२ ऑगस्टपर्यंत ११ हजार पेक्षा जास्त प्रवाशांनी एसटीचे आगाऊ टिकीट आरक्षित केले आहे. तर या सहा दिवसांत ४०६ बसेस मुंबई विभागातून कोकणात रवाना झाल्या आहेत. मात्र, प्रवासी संख्या लक्षात घेता एसटी महामंडळाने १३ ते २१ ऑगस्टपर्यंत कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांना मुदतवाढ दिली होती. मात्र, १३ ऑगस्टपासून कोकणात जाण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार एसटी बसेसच्या प्रवाशांना प्रवासापूर्वी कोरोना चाचणी करणे अनिवार्य केल्याने प्रवाशांनी पाठ फिरवली होती. मात्र, आता कोकणातील चाकरमान्यांनी परतीच्या प्रवासासाठी एसटीला पंसती दिली आहे. एसटीने कोकणातून येणार्‍या चाकरमान्यांसाठी २३ ऑगस्ट ते २ सप्टेंबरपर्यंत ७५१ बसेस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध कल्या आहेत. त्यापैकी ७१ बसेसचे ग्रुप बुकिंग (गट आरक्षण) झाले असून १०६ बसेसचे १०० टक्के व्यक्तिगत आरक्षण झाले आहे. उर्वरित ६३९ बसेसचे अंशतः आरक्षण झाले आहे. म्हणजे आतापर्यंत ७५१ एसटी बसेसपैंकी १७७ बसेसंच आरक्षण हाउस फुल झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -