घरमुंबईवृत्तपत्र विक्रेता राज्यस्तरीय अधिवेशनाची तयारी अंतिम टप्प्यावर

वृत्तपत्र विक्रेता राज्यस्तरीय अधिवेशनाची तयारी अंतिम टप्प्यावर

Subscribe

महाराष्ट्र राज्य वृतपत्र विक्रेता संघटनेचे राज्यस्तरीय आधिवेशन 26 व 27 जानेवारीला डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह, आमदार निवास समोर, सिव्हिल लाईन्स येथे होणार असून या अधिवेशनाची तयारी व आढावा बैठक नागपूर जिल्हाध्यक्ष रमेश नागलकर यांच्या निवासस्थानी राज्य संघटनेचे कार्याध्यक्ष सुनील पाटणकर यांचे अध्यक्षतेखाली व सरचिटणीस बालाजी पवार, विभागीय संघटन सचिव विनोद पन्नासे यांचे प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली.

अधिवेशनाचे ठिकाण, निवास व्यवस्था, भोजनव्यवस्था, रॅलीचे नियोजन या सर्व बाबींची माहिती घेण्यात आली. 26 जानेवारी रोजी दुपारनंतर कार्यकर्ता आगमन व सायंकाळी राज्य संघटनेच्या पदाधिकार्‍यांचे चर्चासत्र होणार आहे. 27 जानेवारी रोजी सकाळी 8.00 वाजता संविधान चौकातील डॉ. आंबेडकर व वृतपत्र विक्रेता पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून देशपांडे सभागृहापर्यंय रॅली काढण्यात येणार असून सकाळी 10.00 वाजता मुख्य आधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. दुपारी 2 ते 4 समारोप सत्र राहील. सायंकाळी 5 वाजता राष्ट्रीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात देशातील दहा राज्यातील वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे प्रमुख हजर राहणार आहेत. या आधिवेशनात वृतपत्र विक्रेत्यांच्या विविध प्रश्नांवर तसेच मुद्रित माध्यमे कशी सशक्त करण्यात वृत्तपत्र विक्रेत्यांचे काय योगदान असू शकेल याबाबत चर्चा करण्यात येणार असून शासनाकडे प्रलंबित असलेल्या वृतपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळाची अंमलबजावणी व राज्यभर सर्वेक्षण करून नोंदण्या सुरू करण्यासाठी यापुढे आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र राज्य वृतपत्र विक्रेता संघटनेच्या वेबसाईटचेही उद्घाटन यावेळी होणार आहे. राज्यस्तरीय वृतपत्र विक्रेता आधिवेशनाचे उद्घाटन केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते होणार असून अध्यक्षस्थानी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे राहणार आहेत. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, आमदार प्रवीण दरेकर, आमदार संजय केळकर, आमदार रामदास आंबटकर, मराठी पत्रकार परिषद मुंबईचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख, महाराष्ट्र राज्य वृतपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष हरिश्चंद्रजी पवार, कार्याध्यक्ष सुनील पाटणकर, सरचिटणीस बालाजी पवार, बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे उपाध्यक्ष रविंद्र चिले, मनहोर परब, रवी संसारे, ठाणे जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता घाडगे, वैभव म्हात्रे व सर्व राज्य संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित राहणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -