नोकरीची सुवर्णसंधी; मुंबई मेट्रोत १ हजार जागांची भरती

मुंबई मेट्रोमध्ये १०५३ जागांची भरती निघाली आहे. अनुभव असणारे किंवा नसणारे आणि शिक्षणाच्या पात्रतेनुसार विविध पदांची ही भरती आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

Mumbai
Recruitment in 1000 seats in Mumbai Metro
Metro

महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड आणि महाराष्ट्र सरकारच्या पीएसयूने दिलेल्या माहितीनुसार मुंबई मेट्रोत १०५३ जागांची भरती निघाली आहे. ही नोकरी कायस्वरुपी स्वरुपाची असणार आहे. वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती निघाली आहे. अनुभव असणारे किंवा नसणारे आणि शिक्षणाच्या पात्रतेनुसार विविध पदांची ही भरती आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विशेषत: मुंबईतील तरुणांसाठी ही एक मोठी संधी आहे. नोकरीसाठी तरुणांनी एमएमआरडीएकडे अर्ज करायचा आहे. अर्जाची प्रक्रिया ऑनलाईन असणार आहे. १६ सप्टेंबर ते ६ ऑगस्टदरम्यान अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु असणार आहे. याशिवाय निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या पदाप्रमाणे सातवा वेतन आयोगानुसार पगार दिला जाणार आहे.

अशी असेल परिक्षा प्रक्रिया

नोकरीसाठी इच्छूक असणाऱ्या तरुणांनी www.mmrda.maharashtra.gov.in या वेबसाईटवर अर्ज भरायचा आहे. त्यानंतर या सर्व अर्जदारांची लेखी परिक्षा घेतली जाईल. लेखी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी केली जाईल. त्यानंतर मुलाखतीसाठी त्यांना बोलवण्यात येईल. अर्ज भरण्यासाठी खुल्यावर्गातील उमेदवारांची परिक्षा फी ३०० रुपये तर राखीव उमेदवारांसाठी १५० रुपये आहे.


हेही वाचा – आरेतील कारशेडविना ‘मेट्रो-३’ अशक्य!