भारतीय प्रजासत्ताक दिन २०२० – जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालांच्या हस्ते जम्मूत ध्वजारोहण

७१ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्लीतील राजपथ सज्ज झाले आहे. तर महाराष्ट्राचा “स्वराज्याचे सरखेल दर्यासारंग- कान्होजी आंग्रे” या विषयावरील चित्ररथ आता मुंबईतील शिवाजीपार्क येथील संचलनात उभारण्यात येणार आहे.

Mumbai
Republic Day 2020 Parade Live Updates delhi and mumbai
जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालांच्या हस्ते जम्मूत ध्वजारोहण

७१ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्लीतील राजपथ सज्ज झाले आहे. या राजपथावर भारतीय लष्कराच्या सामर्थ्यांचे सांस्कृतित वारशांचे आणि सामाजिक – आर्थिक प्रगतीचे दर्शन होणार आहे. तसेच यंदा प्रजासत्ताकदिनी दिल्लीच्या राजपथावरील संचलनात सहभागी होऊ न शकलेला महाराष्ट्राचा “स्वराज्याचे सरखेल दर्यासारंग- कान्होजी आंग्रे” या विषयावरील चित्ररथ आता मुंबईतील शिवाजीपार्क येथील संचलनात उभारण्यात येणार आहे. छत्रपतींच्या आरमार उभारणीत अनेक वीरांनी योगदान दिले त्यापैकी एक म्हणजे “कान्होजी आंग्रे”. या चित्ररथातून स्वराज्याची सेवा करताना कान्होजींच्या नेतृत्वाखाली सागरामध्ये स्वराज्याचे भगवे तोरण कसे दिमाखाने चढले, फडकू लागले, त्यांनी इंग्रज, डच आणि फ्रेंच यांच्यावर समुद्रावरून कसे नियंत्रण ठेवले, याची शौर्यगाथा यातून सांगण्यात येणार आहे.