घरमुंबईमाळशेट घाट दोन दिवस बंद, पुणे-नाशिक महामार्गाला वाहतुकीला ग्रहण

माळशेट घाट दोन दिवस बंद, पुणे-नाशिक महामार्गाला वाहतुकीला ग्रहण

Subscribe

माळशेज घाटात मुसळधार पाऊस आणि दाट धुकं यामुळे आज पहाटे दरड कोसळल्याची घटना घडली आहे. घटनेनंतर खबरदारी म्हणून वाहतूकीचा रस्ता बंद करण्यात आला. माळशेज घाटातील छत्री पॉईंट येथील घटना.

मुसळधार पाऊस आणि दाट धुकं यामुळे आज पहाटे मुरबाड येथील माळशेज घाटात दरड कोसळळ्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर खबरदारीम्हणून येथील वाहतूक काही वेळेसाठी बंद करण्यात आली आहे. माळशेज घाटातील छत्री पाईंट परिसरात दरड कोसळली आहे. या घटनेत एक ट्रक चालक जखमी झाला असून वाहतूकीचा रस्ता बंद करण्यात आला. अमोल दहिफळे असे या ट्रक चालकाचे नाव असून तो पाथर्डी येथील रहिवाशी आहे. घटनेनंतर चालकाला उपचारासाठी माऊली रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माळशेज घाटातून कल्याण आणि इतर ठिकाणी जाणारी वाहतूक आता पुणे आणि नाशिकच्या दिशेने वळवण्यात आली आहे. सध्या दरड हटवण्याचे काम सुरु आहे. मात्र, दाट धुक्यामुळे दरड हटवण्याच्या कामात अडथळा निर्माण झाला असल्याचे सांगण्यात आले.

राष्ट्रीय महामार्ग २२२ माळशेज घाटाहून जातो. कल्याणहून अहमदनगर येथे जाणारी वाहतूक कसारा घाटातून वळवण्यात आली आहे. माळशेज घाटात मुसळधार पाऊस आणि धुकं असल्यामुळे अनेकदा येथे दरड कोसळण्याच्या घटना घडतात. या घटनेनंतर रस्त्यावरुन दरड काढण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. यामार्गाने प्रवास करणाऱ्यांनी माळशेज घाटातून प्रवास करणे टाळावा असे आवाहन करण्यात आले.

दरडीच्या अपघातात थोडक्यात बचावले बापलेक

शहादेव रामा दहिफळे आणि त्यांचा मुलगा अमोल दहिफळे हे दोघे कल्याण येथून कटलरी माल असलेला टेम्पो घेऊन नगरमार्गे जात होते. माळशेज घाटात पोहोचल्यानंतर तेथे जोरदार पाऊस सुरू झाला. त्यामुळे अमोल टेम्पो हळूहळू चालवित होतो. मात्र काही समजण्याच्या आतच गाडीवर दरडी कोसळली. यानंतर वेळीच हँडब्रेक दाबून दोघंही खाली उतरले. सुदैवानं दोघांचेही जीव वाचला. मात्र दरडीसहीत टेम्पो २५ ते ३० फूट खोली दरीत कोसळला.
 

 पुणे-नाशिक महामार्गावर वाहतुक कोंडी

 नेहमीच वाहतुक कोंडीचे ग्रहण लागलेल्या पुणे-नाशिक महामार्गावर आता माळशेज घाटातील दुर्घटनेनंतर लोड आला असुन आळेफाटा,नारायणगाव, मंचर,राजगुरुनगर, चाकण या ठिकाणच्या शहरीभागात वाहतुक कोंडी होत असुन भरपाऊसात वाहतुक पोलीसांची दमछाक सुरु आहे

महामार्ग प्रशासन व पोलीस अधिकाऱ्याची महामार्गावर पहाणी…

 पुणे नाशिक महामार्ग हा खड्ड्यांत महामार्ग,कि महामार्गावर खड्डे या न कळणा-या वस्तुस्थितीची पहाणी आज करण्यात आली मात्र वाहतुक कोंडी यामुळे रुग्णवाहिका सह प्रवाशांना होणारा त्रास होत असताना महामार्गावर दिड ते दोन फुटाचे खड्डे असल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -