घरमुंबईगावकऱ्यांनी सरकारकडे मागितली इच्छामरणाची परवानगी

गावकऱ्यांनी सरकारकडे मागितली इच्छामरणाची परवानगी

Subscribe

हिंगोली जिल्ह्यातील तोकतोडा गावकऱ्यांनी सराकरकडे इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. याशिवाय त्यांनी आपले गाव विक्रिला काढले आहे.

महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये अजूनही पाऊस पडलेला नाही. आशेपोटी शेतकरी आभाळाकडे बघत आहेत. शेतकऱ्यांनी पेरणी देखील केली. मात्र, अध्यापही पाऊस पडलेला नाही. दुष्काळामुळे हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात भीषण अवस्था आहे. त्यातल्या त्यात ताकतोडा गावातील गावकाऱ्यांनी पूर्णपणे आशाच सोडली आहे. त्यांनी सरकारकडे कर्जमाफी, पीकविमा, खाजगी फायनान्स कंपनीकडून किंवा सावकाराकडून घेतलेले कर्ज माफ करावे, अशी मागणी सरकारकडे केली आहे. मात्र, अध्याप या मागण्या मान्य झालेल्या नाहीत. दरम्यान, सलग चार वर्षांपासून पाऊस न पडल्यामुळे गावाची अवस्था फार बिकट झाली आहे. जेवायला तुरळक अन्नधान्य असल्यामुळे गावकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे अशा गंभीर परिसरात गावकऱ्यांनी गाव विकायला काढले आहे आणि सरकारकडे इच्छामरणाची मागणी केली आहे.

‘मुख्यमंत्री साहेब, आमचे गाव शेतजमिनीसह विकत घ्या’

दुष्काळामुळे सेनगाव तालुक्यातील बरेच लोक शहराकडे स्थलांतरित झाले. मात्र, मातीशी एकनिष्ठ राहणाऱ्या ताकतोडा गावकऱ्यांनी गाव सोडले नाही. गावकऱ्यांनी परिस्थितीशी झुंज देण्याचे ठरवले आहे. कर्जमाफी सरसकरट रद्द करण्याच्यासह इतर मागण्यांसह गावकरी गुरुवारी सेनगाव तहसील कार्यालयात गेले आणि त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवले. याशिवाय मान्यता मान्य केल्या नाही तर गाव विकण्याची आणि इच्छामरणाची परवानगी द्या, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, ही मागणी मान्य होत नाही तोपर्यंत गावातील सर्व सरकारी कार्यालये, शाळा बंद ठेवण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे. यासोबतच गावकऱ्यांनी एका ग्रामपंचायत कार्यालयाच्या भिंतीवर पोस्टर लावले आहे. ‘मुख्यमंत्री साहेब, आमचे गाव शेतजमिनीसह विकत घ्या’, असे या पोस्टरवर लिहण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पावसाची पाठ; दुष्काळाची दाहकता वाढली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -