मेट्रो ३ चा खर्च ५ हजार कोटीने वाढणार, प्रकल्पही ५ वर्षे रखडणार

मेट्रो ३ कारशेडच्या मुद्द्यावर जनतेची फसवणूक बंद करा - किरीट सोमय्या

aarey kirit

कुलाबा वांद्रे सीप्झ मेट्रो ३ प्रकल्पातील कारशेड आरे एवजी कांजुरमार्गला हलवण्याचा मुख्यमंत्र्यांनी घेतला. या निर्णयावर आता भाजपकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. आरे कारशेड रद्द केल्यामुळे ५ हजार कोटी रूपयांचा खर्च वाढणार आणि मुंबईकरांच्या वाहतुकीसाठीचा मेट्रो ३ प्रकल्प ५ वर्षे रेंगाळणार असा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला. प्रत्येक ट्रेन ही ८ किलोमीटरचा वळसा घातल्यानंतरच कांजुरमार्ग कारशेडला पार्क करणे शक्य करणे होईल. परिणामी या प्रकल्पातील ऑपरेशनचा खर्चदेखील वाढेल असे ते म्हणाले. तसेच ८ किलोमीटर अतिरिक्त रेल्वेलाईन टाकावी लागणार आहे.

काय म्हणाले किरीट सोमय्या ?

 

मुख्यमंत्र्यांनी आरे कारशेड कांजुरला हलवण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर किरीट सोमय्या म्हणाले की, मुख्यमंत्री महोदय तुम्ही कोणत्या जमीनीबद्दल सांगत आहात ? कांजुरमार्गच्या जागेसाठी आणखी पर्यावरणीय परवानग्या घ्याव्या लागणार आहेत. त्यासाठीही वर्षानुवर्षे जातील असे ते म्हणाले. दुसऱ्या खाजगी जागेचा वाद असल्याने त्या जागेसाठी २ हजार कोटी रूपये कोर्टात जमा करा असे उच्च न्यायालयानेच सांगितले आहे. म्हणूनच जनतेची फसवणूक बंद करा असा आरोप किरीट सोमय्या यांनी यावेळी केला.