घरमुंबईजे. जे. हॉस्पिटलमध्ये ‘समाजसेवा विभाग’ सुरू

जे. जे. हॉस्पिटलमध्ये ‘समाजसेवा विभाग’ सुरू

Subscribe

जे. जे. हॉस्पिटलमध्ये आता समाजसेवा विभाग सुरु झाला आहे. त्यामुळे आता गरिब, होतकरु रुग्णांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे.

भायखळ्यातील सर्वात मोठ्या सर जे. जे या सरकारी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची बरीच गर्दी असते. या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या अर्ध्याहून अधिक रुग्णांची बेताची परिस्थिती असते. हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांना आर्थिक मदत, समुपदेशन आणि रुग्ण संवाद योग्य होण्यासाठी समाजसेवा विभाग सुरू करण्यात आला आहे. सर जे.जे समूह हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांच्या हस्ते २२ जानेवारीला या विभागाचं लोकार्पण करण्यात आलं आहे. हा विभाग रूग्णांना फायदेशीर ठरणार आहे. या विभागाच्या लोकार्पण सोहळ्याला हॉस्पिटलचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. माणकेश्वर, अधीक्षक डॉ. संजय सुरासे, जीवनज्योती ट्रस्टचे हरखचंद सावला, कॅन्सर रिलीफ अँड केअर ट्रस्टचे डिसल्व्हा आणि टाटा ट्रस्टचे प्रतिनिधी उपस्थित होते.

हेही वाचा – जे.जे. हॉस्पिटलमध्ये ‘देणगी समिती खाते’ सुरू

‘नवा विभाग रुग्णांसाठी वरदान ठरेल’

रूग्णसेवा अद्ययावत करण्यासाठी आणि लोकाभिमुख करण्यासाठी हा नवीन विभाग स्थापन करण्यात आला आहे. या विभागामार्फत रूग्णालयात उपचारांसाठी दाखल होणाऱ्या रूग्णांना आर्थिक मदतीसंदर्भात समुपदेशन आणि रूग्णांबरोबर होणारा संवाद योग्यरीत्या होण्यासाठी काम केलं जाणार आहे. तसंच काही कंपन्यांकडून सामाजिक निधी प्राप्त करुन घेण्यासाठीही या विभागाचा फायदा होणार आहे. त्यामुळे हा नवा विभाग रूग्णांसाठी नक्कीच वरदान ठरेल. डॉ. दत्तात्रय विभूते या विभागाचे विभागप्रमुख म्हणून कार्यभार सांभाळतील.
– डॉ. अजय चंदनवाले, जे. जे समूह हॉस्पिटलचे अधिष्ठाता

‘नातेवाईकांना दूसरीकडे जाण्याची गरज पडणार नाही’

जे.जे हॉस्पिटलमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून रुग्ण येतात. रुग्णांची तेवढी परिस्थिती नसते की ते एखाद्या शस्त्रक्रियेचा खर्च उचलू शकतील. त्यामुळे ते अनेकदा सामाजिक संस्थाकडे धाव घेतात. अशा परिस्थितीत त्यांचा वेळ जातो. शिवाय, अनेक फेऱ्या देखील होतात. तो वेळ आणि फेऱ्या दोन्ही वाचवण्यासाठी या विभागाचा नक्कीच फायदा होऊ शकतो. त्याचसोबत त्यांचं समुपदेशनही केलं जाईल. जेणेकरुन रुग्ण आणि नातेवाईकांना दुसरीकडे कुठे जायची गरज पडणार नाही.
-डॉ. संजय सुरासे, वैद्यकीय अधीक्षक, जे. जे. हॉस्पिटल
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -