दक्षिण मुंबईत ‘या’ दिवशी असणार पाणी कपात

येत्या बुधवारी दक्षिण मुंबईत पाणी कपात

Mumbai
One day water cut
पाणी

येत्या बुधवारी २५ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजेपर्यंत दक्षिण मुंबईतील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. भंडारवाडा जलकुंभाचा अभ्यास आणि तपासणी करण्याचे काम पालिकेने हाती घेतल्यामुळे दक्षिण मुंबईतील हा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. या पाणीकपातीला ए, बी आणि ई विभागात राहणाऱ्या रहिवाशांना पाणी कपातीच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.

भंडारवाडा जलकुंभाचा अभ्यास आणि तपासणी कामानंतर पाणी कपातीदरम्यान जलाशयातील पाणी पातळी लक्षात घेऊन त्या-त्या विभागानुसार पाण्याच्या वेळेत बदल करण्यात येणार आहे. पालिकेच्या सांगण्यावरून भंडारवाडा जलकुंभाची तपासणी झाल्यानंतर पुढचे काही दिवस गढूळ पाणी येण्याची शक्यता आहे.

या भागात पाणी पुरवठा असणार बंद

बुधवारी २५ सप्टेंबर रोजी ‘ए’ विभाग

‘नेव्हल डॉकयार्डमध्ये , ‘बी’ विभाग पी. डिमेलो रोड, संत तुकाराम रोड, फ्लँक रोड, केशवजी नाईक रोड, बी. पी. टी. या विभागात पाणीपुरवठा होणार नाही. तर ‘ई’ विभाग बी. पी. टी., मोदी कंपाऊंड, डी. एन. सिंग रोड, हुसेन पटेल रोड, रामचंद्र भट्ट मार्ग, ई. एस. पाटणवाला मार्ग, मोतीशहा लेन, डॉ. मस्करहॅन्स रोड, रामभाऊ भोगले मार्ग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोड, टी. बी. कदम मार्ग, डॉकयार्ड रोड, गनपावडर रोड, कारपेंटर रोड, नवाब टँक रोड, बॅरिस्टर नाथ पै मार्ग, जे. जे. रुग्णालय येथे पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

गुरुवार २६ सप्टेंबर रोजी ‘बी’ विभाग

डोंगरी रोड, युसुफ मेहेरअली रोड, जकारीया मस्जिद रोड, मेमनवाडा रोड, मोहम्मद अली रोड, कांबेकर रोड, झंजीकर रोड, शेरीफ देवजी रोड, अब्दुल रेहमान रोड, पायधुनी येथे पाणीपुरवठा होणार नाही. ‘ई’ विभाग मदनपुरा, ना. म. जोशी रोड, क्लेअर रोड, साखळी रोड, मौलाना आझाद रोड, दत्तारामभाऊ कोयंडे रोड, बीआयटी ताडवाडी, सेठ मोतीशाह मार्ग , जे. जे. रुग्णालय, कस्तुरबा रुग्णालय परिसरात पाणी पुरवठा होणार नाही. तर ‘ई’ विभागात डॉ. आनंदराव नायर रोड, मोटलीबाई रोड, आग्रीपाडा चाळ, मेघराज शेट्टी रोड, जहांगिर बोमन बेहराम रोड, साने गुरुजी रोड, गेल रोड, मौलाना आझाद रोड, नायर रुग्णालय परिसरात पाणी पुरवठा पुर्णतः बंद न ठेवता तो कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू राहणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here