घरमुंबईपालिका शाळांचा टक्का २० टक्क्यांनी घसरला; हिंदी माध्यमाचा विद्यार्थी पहिला

पालिका शाळांचा टक्का २० टक्क्यांनी घसरला; हिंदी माध्यमाचा विद्यार्थी पहिला

Subscribe

मुंबई महानगर पालिकेच्या शाळांचा निकाल यंदा घसरला असून चक्क हिंदी माध्यमातील विद्यार्थी प्रथम आला असल्यामुळे शिक्षणतज्ज्ञांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबई महानगरपालिकेतील मराठी शाळांची होणारी घरघर चिंतेचा विषय ठरत असतानाच यंदा दहावी बोर्डाच्या निकालाने पालिका प्रशासनाची झोप उडाली आहे. मुंबईतील पालिका शाळांचा निकाल यंदा २० टक्क्यांनी घसरला असून तो अवघा ५३.१४ टक्के इतका लागला आहे. विशेष म्हणजे, पालिका शाळांमध्ये हिंदी माध्यमातील राज जैसवाल याने ९३.२० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर पहिल्या १० विद्यार्थ्यांमध्ये एकमेव मराठी माध्यमातील विद्यार्थिनी नेहा मुळे हिने नवव्या स्थानावर आपलं नाव कोरलं आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या शाळेत पुन्हा एकदा मराठी माध्यमांची पीछेहाट सुरु झाल्याची चर्चा सुरु झाली आहे.

काय सांगते आकडेवारी?

मुंबई महापालिकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार यंदा पालिकेच्या ४९ अनुदानित आणि १६१ विनाअनुदानित अशा एकूण २१० माध्यमिक शाळांमधून एकूण १३ हजार ५६३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी केवळ ७ हजार २०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पालिका शाळांचा एकूण निकाल ५३.१४ टक्के लागला असून दोन शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. तर ९० टक्के आणि त्यापेक्षा अधिक गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या १२ इतकी असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.

- Advertisement -

हे वाचलंत का? – मीरारोडच्या बहाद्दराचा अजब विक्रम; पठ्ठ्याला सगळ्याच विषयांत ३५!

शिक्षणतज्ज्ञांची नाराजी

दरम्यान, गुरु गोविंद सिंग मार्ग मनपा माध्यमिक शाळेतील राज जैसवाल या विद्यार्थ्याने ९३.२० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. एन. एम. जोशी मुंबई पब्लिक स्कूल शाळेतील पूजा कनोजिया हिने ९२.६० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक आणि ग्लोब मिल पॅसेज मनपा माध्यमिक शाळेतील मल्लिका अरतुला या विद्यार्थिनीने ९२.४० टक्के गुण मिळवून तिसर्‍या क्रमांक पटकावला आहे. दरम्यान, पालिका शाळेच्या या निकालाने पुन्हा शिक्षणतज्ज्ञांनी नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे कोट्यवधी रुपयांचे अनुदान शाळांना दिले जात असतानाच निकालाची होणारी पिछेहाट लक्षात घेता पालिका शाळांना देखील चिंतन करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया या निमित्ताने करण्यात येत आहे.


हेही वाचा – …म्हणून यंदा दहावीच्या निकालाचा टक्का घसरला; वाचा कारण!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -