घरमुंबईअहवाल लवकर सादर करा; राज्य सरकारचे मागास आयोगाला पत्र

अहवाल लवकर सादर करा; राज्य सरकारचे मागास आयोगाला पत्र

Subscribe

सरकारच्या मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मागास वर्ग आयोगाचे अध्यक्ष आणि माजी न्यायमूर्ती एम.जी गायकवाड आणि सदस्य सूवर्णा रावल यांची भेट घेतली. मराठा आरक्षणासंदर्भातील अहवाल लवकरात लवकर सादर करा अशी विनंती यावेळी त्यांनी केली.

सध्या राज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्दावरून वातावरण तापले आहे. सराकरनेही या मराठा ठोक मोर्चाची गंभीर दखल घेत हालचाली करण्यास सुरूवात केली आहे. आज सरकारच्या मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मागास वर्ग आयोगाचे अध्यक्ष आणि माजी न्यायमूर्ती एम.जी गायकवाड आणि सदस्य सूवर्णा रावल यांची भेट घेत मराठा आरक्षणा संदर्भातील अहवाल लवकरात लवकर सादर करा अशी विनंती केली. यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे. पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आशिष शेलार आणि प्रविण दरेकर उपस्थित होते.

नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील

मागास आयोगाच्या अहवालानुसार मराठा समाजाला आरक्षण दिले जाणार तो अहवाल लवकर यावा यासाठी मागास आयोगाच्या अध्यक्षांना आम्ही पत्र दिले आहे. मागास आयोगाचा अहवाल लवकरात लवकर यावा अशी समाजाची मानसिकता आहे असे आम्ही आयोगाच्या अध्यक्षांना सांगितले आहे. तसेच आयोगाकडे आतापर्यंत १ लाख ८७ हजार मराठा समाजाची निवेदने आली आहेत. तसेच ३१ जूलैपर्यंत सर्व्हेचे काम पूर्ण होणार असून, हे काम पाच एजन्सीच्या माध्यमातून हे काम करण्यात येणार आहे. तसेच काम जलदगतीने व्हावे यासाठी सरकार त्यांना आवश्यक ती मदत पूरवणार असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

- Advertisement -

शिवसेनेच्या मंत्र्यांबाबत चंद्रकांत पाटलांचे मौन

दरम्यान, या शिष्ठमंडळात शिवसेनेच्या मंत्र्यांना का बोलावले नाही असे चंद्रकांत पाटील यांना विचारले असता त्यांनी मौन बाळगणे पसंत केल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजपामधील दरी वाढत चालली आहे का असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -