घरमुंबईनिर्बिजीकरणातून भटक्या कुत्र्यांचा मृत्यू

निर्बिजीकरणातून भटक्या कुत्र्यांचा मृत्यू

Subscribe

मुंबई महापालिकेच्या हद्दीत भटक्या कुत्र्यांची समस्या निर्माण झाली आहे. या भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येला रोखण्यासाठी महानगर पालिकेच्या माध्यमातून निर्बिजीकरण केले जात आहे. या निर्बिजीकरणासह (नसबंदी) अँटी रेंबीज लसीकरण आणि जंताचे औषध देतात. या निर्बिजीकरणातून ईशान्य मुंबईतील भटक्या कुत्र्यांचे मृत्यूचे प्रमाण अचानक वाढल्याचे उघड झाले आहे. या भटक्या कुत्र्यांच्या मृत्यूस पालिकेच्या निर्बिजीकरण आणि अँटी रेंबीज लसीकरणच कारणीभूत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मनोहर जरियाल यांनी केला आहे.

उत्कर्ष स्टार मंडळाने पैशांसाठी नियम बसवले धाब्यावर

सामाजिक कार्यकर्ते मनोहर जरीयाल यांनी परळच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात मरणासन्न अवस्थेत असलेल्या विक्रोळी पार्क साईट इथल्या भटक्या कुत्र्याला उपचारासाठी दाखल केले होते. रविवारी पशुवैद्यकीय रुग्णालयात भटक्या कुत्र्याचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयाने सांगितले. यानंतर मनोहर जरियाल यांना भटक्या कुत्र्याचे डेथ सर्टिफिकेट परळच्या पशुवैद्यकीय रुग्णालयाने दिले. यातली गंभीर बाब म्हणजे हा भटका कुत्रा चार महिन्यांचा होता. प्राणी प्रजनन नियमावली नुसार एक वर्ष असलेल्या कुत्र्यांचेच निर्बिजीकरण केले जाते. पण मनपाच्या पथकाने निर्बिजीकरण करण्यासाठी कार्यरत असलेल्या मुलंड उत्कर्ष स्टार मंडळाने हे नियम पैशासाठी धाब्यावर बसवल्याचे स्पष्ट झाले आहे.

- Advertisement -

भटक्या कुत्र्याची योग्य काळजी घेतली जात नाही

परळच्या पशुवैद्यकीय रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर डी जे खन्ना यांनी या प्रकरणाला दुजोरा दिला आहे. मनपातर्फे चालवल्या जाणाऱ्या निर्बिजीकरण दवाखान्यात भटक्या कुत्र्याची योग्य ती काळजी घेतली जात नसल्याचे मान्य केले आहे. याचवेळी त्यांनी पालिकेच्या निर्बिजीकरण दवाखान्यात एखाद्या भटक्या कुत्र्याला डिस्टपर आजार झाला असेल तर त्या कुत्र्यामुळे इतर भटक्या कुत्र्यांना तिथेच ठेवले तर डिस्टमपर नावाचा आजाराने कुत्र्याचा मृत्यू ओढवतो. त्यामुळेच निर्बिजीकरणातून भटक्या कुत्र्याच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे उघड झाले आहे. पूर्व उपनगरात गेल्या पाच दिवसात अनेक कुत्रे मरण पावले आहेत. त्यांच्या या अवस्थेला मुलुंडच्या साईधाम येथील उत्कर्ष स्टार मंडळ या संस्थेतील डॉक्टर कारणीभूत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मनोहर जरियाल यांनी केला आहे.

घाटकोपरमध्ये ७ ते ८ कुत्र्यांचा अचानक मृत्यू

भटक्या कुत्र्यांच्या मृत्यूने प्राणी मित्रांमध्ये रोष निर्माण झाला आहे. घाटकोपर कामालेन मार्गातील अनेक कुत्रे गेल्या काही दिवसांत मृत पावले आहेत. २० आणि २४ एप्रिल २०१८ रोजी महानगर पालिकेच्या पथकाने भटके कुत्रे पकडून त्यांचे निर्बिजीकरण करून पुन्हा त्याच जागी सोडले. मात्र गेल्या काही दिवसांत निर्बिजीकरण केलेले कुत्रे अकस्मात मृत पावत आहेत. या भटक्या कुत्र्यांची अवस्था बिकट झाली आहे. सोडण्यात आलेले कुत्रे आजारी अवस्थेत असून, ते काहीही खात नसून एकाच जागी निपचित पडून निद्रावस्थेत आहेत. कामालेन येथील प्राणीमित्र रवी दवे (६५) हे गेल्या ३० वर्षांपासून येथील भटके कुत्रे, मांजर यांना खायला बिस्कीट, दूध देत आहेत. त्यांची ही सेवा रोज अविरत सुरु आहे. मात्र गेल्या एप्रिल महिन्यात पालिकेने नेलेल्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण केल्यानंतर ७ ते ८ कुत्रे अचानक दोन दिवसांत मरण पावल्याने रवी दवे आणि येथील अनेक प्राणीमित्र पालिकेच्या या अकार्यक्षमतेबद्दल संताप व्यक्त करत आहेत.

- Advertisement -

उत्कर्ष स्टार मंडळाकडून उत्तर नाही

निर्बिजीकरण करून काही कुत्र्यांची ओळख म्हणून पालिकेने कुत्र्यांचे कान कापले आहेत. कापलेल्या कानांमुळे कुत्र्यांना इजा होत आहे. मुलुंड पश्चिम येथील उत्कर्ष स्टार मंडळ या संस्थेमार्फत भटके कुत्र्यांना पकडून निर्बिजीकरण केले जात असून येथील डॉक्टरांनी ऑपरेशन केलेले कुत्रे मरण पावत आहेत. याबाबत उत्कर्ष स्टार मंडळाच्या संस्थेच्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधला असता याबाबत इथली वैदयकीय टीम याबाबत उत्तर देत नाही आहे. मात्र मुबंई महापालिकेचे स्लॉटर हाऊसचे जनरल मेनेजर योगेश शेट्ये यांनी डिस्टमपर आजार भटक्या कुत्र्याना व्हायरल इनफेक्शन होतं असल्याचे सांगितले आहे

निर्बिजीकरणासाठी पालिकेकडून कोटी रुपयांचा खर्च

निर्बिजीकरणासाठी महापालिका अडीच कोटी रुपये खर्च करते. शहर विभागात ५० लाख, पूर्व आणि पश्चिम उपनगरासाठी २ कोटी रुपये खर्च करते. या निर्बिजीकरणासाठी पालिकेन ६ संस्थाना कंत्राट दिले आहे. या संस्था निर्बिजीकरणाचे काम करतात. पण भटक्या कुत्र्याच्या मृत्यूमुळे या संस्थाच्या कामाबदल प्रश्न चिन्ह उपस्थित करत आहेत.

कुत्र्यांचे निर्बिजीकरणाचे काम या संस्थांना दिले आहे

– उत्कर्ष स्टार मंडळ, मुलुंड
– इन डिफेन्स ऑफ एनिमल, देवनार
– बीएसपीसीए, परळ
– डब्ल्यूएसडी, महालक्ष्मी
– युनिव्हर्सल, मालाड
– अहिंसा, मालाड

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -