राज्यराणी एक्स्प्रेसवर दगडफेक; मोटरमन जखमी

वासिंद आणि आटगाव स्टेशनच्या दरम्यान एका अज्ञाताने एक्स्प्रेसवर दगड फेकला. हा दगड इंजिनच्याकाचेवर पडला. ही काच फुटून काचेचा तुकडा मोटरमनच्या डोळ्यात घुसली.

Kasara
stone throwing rajyarani express
राज्यराणी एक्स्प्रेसवर दगडफेक

धावत्या लोकलवर दगडफेकीच्या घटना वारंवार समोर येत आहे. मंगळवारी रात्री ८च्या सुमारास धावत्या राज्यराणी एक्स्प्रेसवर अज्ञाताने दगड फेकल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये राज्यराणी एक्स्प्रेसचा मोटरमन जखमी झाला आहे. राज्यराणी एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन नाशिकडे जात होती. त्यावेळी वासिंद आणि आटगाव स्टेशनच्या दरम्यान एका अज्ञाताने एक्स्प्रेसवर दगड फेकला. हा दगड इंजिनच्या काचेवर पडला. यावेळी काच फुटून काचेचा तुकडा मोटरमनच्या डोळ्यात घुसला. यामध्ये मोटरमनच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. या महामार्गावर वारंवार दगडफेकीच्या घटना घडतात.

अशी घडली घटना

मंगळारी रात्री ८ वाजता राज्यराणी एक्स्प्रेस नाशिककडे जात होती. दरम्यान, वासिंद आणि आटगाव स्टेशनच्या दरम्यान एका अज्ञाताने मोठा दगड गाडीकडे भिरकावला. हा दगड थेट मोटरमनच्या केबिनवर पडला. यामध्ये केबिनची काच फूटून त्याचा एक तुकडा मोटरमनच्या डोळ्याला लागला. मोटरमनला डोळ्याला गंभीर दुखापत झाली असताना देखील त्यांनी गाडी थांबवली नाही. प्रसंगावधान राखत त्यांनी गाडी थेट कसारा स्टेशनवर थांबवली. त्याठिकाणी त्यांच्या डोळ्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर गाडी थेट नाशिककडे रवाना झाली.

हेही वाचा – 

लोकल ट्रेनवर अज्ञातांची दगडफेक, महिला प्रवासी जखमी

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here