घरमुंबईमहिला दिनापासून धावणार तेजस्विनी बसेस

महिला दिनापासून धावणार तेजस्विनी बसेस

Subscribe

महिलांचा दैनंदिन प्रवास सुरक्षित, सुखकर व्हावा याकरता राज्य सरकारने तेजस्विनी बस योजने अंतर्गत नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाकरिता 10 तेजस्विनी बसेस मंजूर केल्या आहेत. या बसेस उपक्रमाच्या बस ताफ्यात समाविष्ट झाल्या आहेत. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 8 मार्च 2019 रोजी तेजस्विनी बसेसचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

या बसेस फक्त महिला प्रवाशांसाठी आरक्षित असणार आहेत, तसेच गर्दीच्या वेळेत बसेस चालविण्याच्या वेळा सकाळी 7.00 ते 11.00 व सायंकाळी 5.00 ते 09.00 या दरम्यान किंवा स्थानिक परिस्थिती आणि आवश्यकता यानुसार चालविण्यात येतील, तसेच इतर वेळी नियमित व्यवस्थेनुसार चालविण्यात येतील. या बसेसमध्ये चालक आणि वाहक महिलाच असणार आहेत.

- Advertisement -

वाशी रेल्वे स्थानक ते घणसोली घरोंदा, घणसोली घरोंदा ते नेरुळ सेक्टर 46/48, वाशी सेक्टर 07 ते खारघर जलवायू, ऐरोली बस स्थानक ते ठाणे मार्गे पटणी, खारघर रेल्वे स्थानक ते खारघर व्हॅली शिल्प, सेक्टर 36, खारघर रेल्वे स्थानक ते तळोजा, मानसरोवर रेल्वे स्थानक ते कळंबोली पोलीस मुख्यालय, या मार्गांवर या बसेस धावणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -