घरमुंबई'डॉ. मनमोहन सिंग' की 'ठाकरे'; शरद पवार पाहणार हा चित्रपट

‘डॉ. मनमोहन सिंग’ की ‘ठाकरे’; शरद पवार पाहणार हा चित्रपट

Subscribe

शरद पवार यांचे स्व. बाळासाहेब ठाकरे आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग या दोहोंसोबतही सलोख्याचे संबंध होते. मात्र या दोघांपैकी ते कुणाचा बायोपिक पाहणार??

शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यामध्ये राजकीय मतभेद जितके प्रसिद्ध होते, तेवढीच त्यांची मैत्रीही घट्ट होती. राज ठाकरे आणि इतर नेत्यांनी अनेकदा दोन्ही ज्येष्ठ नेत्यांच्या मैत्रीचे किस्से सांगितले आहेत. त्याचबरोबर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासोबतही पवार यांचे संबंध चांगले होते. २००४ ते २०१४ या दहा वर्षाच्या काळात पवारांनी मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली कृषिमंत्री म्हणून काम केले होते. सध्या दोन्ही नेत्यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट आलेले आहेत. माजी पंतप्रधान मनोहन सिंग यांच्या जीवनावर आधारीत ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ प्रदर्शित झालाय तर स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर बेतलेला ‘ठाकरे’ चित्रपट २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. या दोन्हीपैकी कोणता चित्रपट पाहणार असा प्रश्न कोल्हापूर येथे काही पत्रकारांनी शरद पवार यांना विचारला. यावर पवार यांनी असे उत्तर दिले…

पत्रकारांनी असा प्रश्न विचारला असता पवार म्हणाले की, “मी फार चित्रपट पाहत नाही. पण ठाकरे पाहण्यासाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी निमंत्रण दिले असून मी उद्या मुंबईमध्ये ठाकरे चित्रपट पाहायला जाणार आहे.” पवार पुढे असेही म्हणाले की, आमच्या क्षेत्रात म्हणजेच राजकारणात दररोज सिनेमे दिसत असतात. भूमिका बदलत असतात, असेही ते म्हणाले. तसेच कोणी कोणला मतदान द्यायचे हे चित्रपट पाहून जनता ठरवत नाही, असेही पवार म्हणाले.

- Advertisement -

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय बायोपिक

२०१९ साली देशात लोकसभा निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय बायोपिकचे चांगलेच पिक आलेले दिसून येत आहे. शिवसेनेकडून ‘ठाकरे’ चित्रपटाच्या निमित्ताने बाळासाहेबांचे विचार लोकांना सांगण्याची धडपड केली जात आहे. तर अनुपम खेर अभिनित ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटातून मनमोहन सिंग आणि काँग्रेसवर टीका केली जात आहे. तसेच विवेक ऑबेरॉय लवकरच ‘पीएम मोदी’ हा मोदींच्या जीवनावर आधारीत असलेला बायोपिक लवकरच घेऊन येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -