‘केदारनाथ’च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा!

'केदारनाथ' चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शाला रोख लावणारी याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली असून केदारनाथ चित्रपटाला त्यामुळे हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.

Mumbai
bombay-high-court
हायकोर्टाचा राज्य सरकारला आदेश

‘केदारनाथ’ चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शाला रोख लावणारी याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली असून केदारनाथ चित्रपटाला त्यामुळे हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. मुंबई हायकोर्टात केदारनाथ चित्रपटाच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज, गुरुवारी सुनावणी झाली असून हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे. चारधामांपैकी एक पवित्र असलेल्या ‘केदारनाथ’ या देवस्थानाच्या नावाने लव्हस्टोरीवर आधारीत चित्रपट कसा तयार केला जातो, असा सवाल करत या चित्रपटाविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती.

वाचा : ‘केदारनाथ’ चित्रपटाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल

वकिलांनी केली याचिका दाखल 

रमेशचंद्र मिश्रा आणि  प्रभाकर त्रिपाठी या दोन वकिलांच्यावतीने ही याचिका बुधवारी मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाचं पुन्हा परिक्षण करावे. परिक्षण होत नाही तोपर्यंत चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती द्यावी, अशी मागणी या याचिकेद्वारे त्यांनी केली होती. दरम्यान, सीबीएससीतर्फे देखील ही याचिका राजकीय हेतून प्रेरित असू शकते तसंच आम्ही या चित्रपटाचे परीक्षण केले असल्याचा दावा केला.

वाचा : ‘केदारनाथ’च्या अडचणी वाढल्या; हाय कोर्टात याचिका दाखल!