घरमुंबईमराठी रंगभूमीची १७५ वर्षानिमित्त ३ खंड

मराठी रंगभूमीची १७५ वर्षानिमित्त ३ खंड

Subscribe

समितीची लवकरच बैठक अपेक्षित

महाराष्ट्राच्या मराठी संगीत रंगभूमीला १७५ वर्षे पुर्ण होत आहेत. यानिमित्ताने स्वतंत्र राज्य गॅझेटियर (दर्शनिका) स्वरूपात तीन खंड प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. राज्याच्या दर्शनिका विभागाकडून या तीन खंडांची प्रसिद्ध प्रत्येक वर्षी एक या पद्धतीने करण्यात येईल. या तीन खंडासाठी मुख्य समिती नेमण्यात आली आहे. येत्या दिवसांमध्ये मंत्री सांस्कृतिक कार्य यांच्या अध्यक्षतेत बैठकही आगामी दिवसात अपेक्षित आहे. आता नवीन सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारानंतर ही बैठक घेण्यात येईल अशी अपेक्षा केली जात आहे.

महाराष्ट्राच्या वैभवशाली संगीत नाट्य परंपरेचे जतन व्हावे, संवर्धन व्हावे या उद्देशाने संगीत रंगभूमीमधील विविध पर्वाच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी हे खंड प्रसिद्ध होणार आहेत. आगामी पिढीला यातून प्रेरणा मिळावी हादेखील त्यामागचा उद्देश आहे. यानिमित्ताने विविध खंडांसाठी माहितीचे संकलन करण्यासाठी उपसमितीही लवकरच नेमण्यात येणार आहे. पहिल्या खंडामध्ये रंगभूमीला व्यक्तीगत योगदान देणार्‍यांबाबतची माहिती असणार आहे. त्यामध्ये १८४३ ते १८७९ तसेच १८८० ते १९३२ असे दोन टप्पे असतील. तसेच विविध भाषांमधील रंगभूमीचा उल्लेख आणि कृष्णधवल फोटो यांचाही समावेश असेल. पारसी, गुजराती, कानडी या भाषांमधील रंगभूमीचा समावेशही यामध्ये करण्यात येणार आहे.

- Advertisement -

दुसर्‍या खंडामध्ये दादासाहेब फाळके यांच्या योगदानाचा चित्रपटसृष्टीवर झालेला परिणाम याचा आढावा घेण्यात येईल. तसेच प्र के अत्रे, मामा वरेरकर यांच्या योगदानाचाही उल्लेख आहे. कृष्णधवल तसेच रंगीत अशा दोन्ही फोटोंचा त्यामध्ये समावेश आहे. तिसर्‍या खंडात महाराष्ट्र राज्य निर्मिती ते २०२० सालापर्यंतच्या घडामोडींचा उल्लेख आहे. विद्याधर गोखले, वि वा शिरवाडकर, वसंत कानिटकर यांचे विविध पर्वांमध्ये संगीत रंगभूमीसाठीचे योगदान याचा उल्लेख तिसर्‍या खंडात असणार आहे. तसेच राष्ट्रीय व्यक्तीमत्वांच योगदानही या तिसर्‍या खंडात असेल. त्यामध्ये महादेव रानडे, आगरकर, कुंटे, विष्णुशास्त्री चिपळुणकर अशा दिग्गज व्यक्तींच्या योगदानाचा समावेश या खंडात असणार आहे.

यानिमित्ताने विविध स्वरूपातील संहिता गोळा करण्याचाही आमचा मानस असल्याचे दर्शनिका विभागाचे सचिव आणि कार्यकारी संचालक डॉ दिलीप बलसेकर यांनी सांगितले. पौराणिक, एतिहासिक, राष्ट्रवाद आशयाच्या, जनजागृती, समाज प्रबोधन, रूपकात्मक, स्वप्नरंजित, अनुवादित अशा विविध स्वरूपाच्या संहितांचा समावेश त्यामध्ये असेल. तसेच नाटकाची दुर्मिळ तिकिटे, छायाचित्रे आणि पोस्टर्सही आम्ही गोळा करणार आहोत असे त्यांनी सांगितले. .

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -