घरमुंबईडेटींगचे आमिष दाखवून वृद्धाची फसवणूक

डेटींगचे आमिष दाखवून वृद्धाची फसवणूक

Subscribe

तोतया पोलिसांकडून73 लाखांना गंडा

डेटींग झोन कंपनीतून बोलत असून असून मुलींना भेटण्यास मिळेल, असे सांगून त्यानंतर क्राईम ब्रान्चमधून बोलत असल्याचा बनाव करून एका वृद्धाला काही जणांनी ७३ लाखांना लुबाडले. बँक खात्यावर 73 लाख 51 हजार 842 रुपये जमा करण्याचे सांगून 60 वर्षीय इसमाची फसवणूक केल्याचा प्रकार खारघर येथे घडला आहे. फसवणूक करणार्‍या विरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सेक्टर 19 खारघर येथील राम यादव (नाव बदललेले आहे) हे कराड येथील कोयना सहकारी दुध उत्पादक, संघ कराड येथे कामास होते. सध्या ते निवृत्त असून त्यांचा दुधाचा व्यवसाय आहे. त्यांना 2018 मध्ये एका महिलेचा फोन आला व त्या महिलेने लोकन्टो डेटींग कंपनीमधून बोलत असल्याचे सांगितले. तसेच त्यांची कंपनी चांगल्या महिलांसोबत चॅटिंग करण्यासाठी डेटींग फ्रेंडशिप सर्व्हिस पुरवत असून त्याकरीता रजिस्ट्रेशन फि 3 हजार रूपये भरावे लागतील असे सांगितले. त्यानंतर चॅटिंग करणार्‍या महिलांचे फोटो व त्यांचे फोन नंबर देण्याचे कबुल केले.

- Advertisement -

त्यानुसार 60 वर्षीय इसमाने ऑनलाईन 3 हजार रुपये त्यांच्या खात्यात ट्रान्सफर केले. त्यानंतर पुन्हा काही दिवसांनी चटींग करणार्‍या महिलांचे नंबर, फोटो व ओळखपत्र बनविण्याकरता 43 हजार 600 रुपये जमा करावे लागतील असे सांगून ती रक्कम तुम्हाला परत मिळेल, असे त्या महिलेने सांगितल्याने त्यांनी सारीफुल इस्लाम नावाच्या खात्यावर ऑनलाईन रक्कम ट्रान्सफर केली. त्यानंतर देवाशीष नावाच्या व्यक्तीचा त्यांना रोज फोन येत असल्याने 60 वर्षीय इसमाने ऑगस्ट 2018 पर्यंत 8 लाख रूपये ऑनलाईनने त्यांच्या खात्यात जमा केले होते.

मात्र त्यांनी कोणतीही माहिती व फोन नंबर न दिल्याने 60 वर्षीय इसमाने त्यांच्याकडे भरलेले पैसे परत मागण्यास सुरुवात केली. परंतु त्यांनी पैसे पाठविण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर सप्टेंबर 2018 मध्ये त्यांना पोलीस बोलत असल्याचा फोन आला. पुणे, शिवाजीनगर क्राईम ब्रँच वरून बोलत असून डेटिंग करणे गुन्हा असल्याचे सांगत अटक होईल अशी धमकी त्यांना देण्यात आली. त्यानंतर कंपनीचे लोक सांगतील त्याप्रमाणे पैसे भरा, असे फोनवर धमकावण्यात आले. त्यामुळे घाबरून अटक होऊ नये या भितीने 60 वर्षाच्या व्यक्तीने दिलेल्या खात्यावर ऑनलाईन पैसे पाठवले. तसेच देवाषीश याने लेट फि, रक्कम परत मिळण्याकरता प्रोसेसींग फि, जीएसटी, सर्व्हिस चार्ज, बँक चार्ज, अडमिन चार्जेस, अ‍ॅडव्होकेट चार्जेस, प्रतिनिधी पाठविण्याचे चार्जेस अशी विवीध कारणे सांगून आत्तापर्यंत भरलेली रक्कम परत पाहिजे असल्यास तुम्हाला वरील चार्जेसची फि भरावी लागेल. असे त्यांना सांगितले. त्यानंतर ही रक्कम परत मिळेल या आशेवर या 60 वर्षीय इसमाने त्या-त्या दिवषी रक्कम ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या खात्यात भरली. मात्र पैसे परत मिळाले नाहीत. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -