घरमुंबईदलित पँथरचे संस्थापक राजा ढाले यांचे निधन

दलित पँथरचे संस्थापक राजा ढाले यांचे निधन

Subscribe

दलित पँथरचे संस्थापक राजा ढाले यांचे दु:खद निधन झाले आहे.

दलित पँथरचे संस्थापक राजा ढाले (७८) यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले आहे. आज सकाळी विक्रोळी येथील निवासस्थानी त्यांचे दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या बुधवारी म्हणजे १७ जुलै रोजी दुपारी १२ वाजता विक्रोळी पूर्वेतील त्यांच्या निवसस्थानाहून सुरू होऊन दादर चैत्यभूमी येथील इलेक्ट्रिक स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. आता त्यांचे पार्थिव गोदरेज रुग्णालय येथे नेण्यात येत असल्याची माहिती त्यांची कन्या गाथा ढाले यांनी दिली आहे.

राजा ढाले यांच्या निधनाची दुःखद वार्ता कळताच आंबेडकरी जनतेत तीव्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे.
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राजा ढाले यांच्या निधनाची वार्ता कळताच तीव्र शोक व्यक्त केला आहे. राजा ढाले यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ‘आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार; मार्गदर्शक; दलित पँथरचा महानायक हरपला’, अशी शोकभावना व्यक्त करून रामदास आठवले यांनी दिवंगत राजा ढाले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

राजा ढाले यांच्या निधनाने सत्तर सालातील आंबेडकरी चळवळीतील अभ्यासु नायक हरवला. दलित पँथरच्या दुर्देवी कलहानंतर आंबेडकरी चळवळीत निर्माण झालेल्या वेगवेगळ्या प्रवाहात स्वत:चे वैचारिक स्थान कायम ठेवून चळवळ आणि बाैध्द धम्माचा मार्गदर्शकचा आज अंत झाला. त्यांच्या स्मुतीस भावपुर्ण आदंराजली.
– संदीप डोळस, सरचिटणीस, समता अभियान महाराष्ट्र
- Advertisement -

आंबेडकरी चळवळीचा ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला – मुख्यमंत्री

दलित पँथरचे एक प्रमुख संस्थापक राजा ढाले यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ मार्गदर्शक असलेले एक वादळी व्यक्तिमत्व आपण गमावले आहे अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री आपल्या शोक संदेशात म्हणाले की, ‘ढाले हे समतेसाठीच्या चळवळीतील एक अभ्यासू आणि ध्येयवादी व्यक्तिमत्व होते. दलित पँथरच्या माध्यमातून समाजातील वंचित आणि उपेक्षित घटकांच्या आकांक्षांना त्यांनी एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून दिले. ही चळवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकीय इतिहासातील एक महत्त्वाचे पर्व आहे. सत्तरीच्या दशकात या चळवळीने केलेला संघर्ष आंबेडकरी चळवळीला एक नवा आयाम देणारा ठरला होता आणि त्यातील श्री राजा ढाले यांचे योगदान अतिशय मोलाचे होते. त्यांच्या निधनाने एक लढाऊ नेता, प्रतिभावंत साहित्यिक आणि परिवर्तनवादी चळवळीचा महत्त्वाचा भाष्यकार आपण गमावला आहे.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -