घरमुंबईपतीनेच केली त्या युवतीची हत्या

पतीनेच केली त्या युवतीची हत्या

Subscribe

 दोघांना ठोकल्या पोलिसांनी बेड्या

कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये महिलेच्या हत्येला वेगळे वळण मिळाले असून तिची हत्या तिचा पती सचिन करोतीया यानेच केली असल्याची खळबळजनक माहिती उजेडात आली. सचिन हा सर्‍हाईत गुन्हेगार असून, पत्नी सनमच्या चारित्र्यावर संशय असल्याने त्याने आपल्या मित्राच्या सहकार्याने तिची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी दिली.

कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये शुक्रवारी संध्याकाळी ४.३० च्या सुमारास उल्हासनगरमध्ये राहणारी सनम करोतीया या महिलेची हत्या करुन दोन बाईकस्वार पसार झाले होते. जखमी सनमला खाजगी रुग्णालयात दाखल केले असता तिचा मृत्यू झाला. सीसीटीव्हीत संपूर्ण घटना कैद होती मात्र, सीसीटीव्हीतील दृश्य स्पष्ट नसल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. याप्रकरणी पोलिसांनी करण उर्फ बाबू ढकणी याला ताब्यात घेतले. सुरुवातीला पोलिसांचा बाबूवर संशय होता, कारण बाबू आणि सनममध्ये प्रेमसंबंध सुरु होते. मात्र, पोलिसांचा तपास जसाजसा पुढे गेला तसतसे या घटनेने वेगळेच वळण घेतले. याप्रकरणी पोलिसांनी सनमचा पती सचिन उर्फ बाबू करोतीया आणि त्याची बाईक चालवणारा सहकारी दिपक ठाकूर यांना अटक केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -