घरमुंबईशीवच्या रस्त्यावरील चौकाला देणार 'ह्या' मराठी अभिनेत्रीचे नाव!

शीवच्या रस्त्यावरील चौकाला देणार ‘ह्या’ मराठी अभिनेत्रीचे नाव!

Subscribe

शीवच्या रस्त्यावरील चौकाला देणार मराठी अभिनेत्रीउमा भेंडे यांचे नाव.

शीव येथील ज्या रस्त्यांवर जैन धर्मियांची नावे देण्यात आली आहे, त्याच रस्त्यांवरील चौकात आता एकेकाळी मराठी चित्रपट सृष्टी गाजवणार्‍या थोरतांच्या कमळेचे नाव दिले जाणार आहे. थोरातांच्या कमळेची भूमिका गाजवणार्‍या उमा भेंडे यांचे नाव या चौकाला देण्यात येणार असून याचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.शीव येथील स्वामी श्री वल्लभदास मार्ग आणि अभिनंदन स्वामी जैन देरासर मार्ग जेथे एकमेकांस मिळतात. तेथे होणार्‍या चौकास उमा प्रकाश भेंडे चौक असे नाव देण्याच्या मागणी भाजपच्या नगरसेविका राजेश्री राजेश शिरवडकर यांनी केली आहे.

मराठी अभिनेत्रीचे नाव देण्याच्या या मागणीचे शीवध्ये स्वागत

या चौकाचे नामकरण न झाल्याने तसेच महापालिकेच्या नामाभिकरण धोरणाशी सुसंगत असल्याने या चौकाचे नामकरण करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थापत्य शहर समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. एका बाजुला मुंबईतील रस्त्यांना अमराठी व्यक्तींची नावे दिली जात असताना, मराठी अभिनेत्रीचे नाव देण्याच्या या मागणीचे स्वागत शीवमधील नागरिकांकडून केली जात आहे. कृष्णधवल चित्रपटांच्या काळात मराठी प्रेक्षकांच्या मनावर मोहिनी घालणार्‍या व मराठी चित्रपटसृष्टीत उल्लेखनीय भूमिका साकारत उमा भेंडे यांनी मराठी रसिकमनावर राज्य केले होते. त्यामुळे या सोज्वळ अभिनेत्रीच्या मराठी चित्रपट सृष्टीतील अनमोल योगदानाची स्मृती जनमानसात चिरंतन राहावी यासाठी या चौकाला त्यांचे नाव देण्याची मागणी आपण केल्याचे राजेश्री शिरवडकर यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

उमा भेंडे यांचे गाजलेले चित्रपट

उमा भेंडे यांनी थोरातांची कमळा या चित्रपटात त्यांनी प्रथमच नायिकेची भूमिका केली होती. त्यानंतर त्यांनी मधुचंद्र, आम्ही जातो आमुच्या गावा, अंगाई, काका मला वाचवा, शेवटचा मालुसरा, मल्हारी मार्तंड, स्वयंवर झाले सीतेचे, भालू असे ८० हून अधिक चित्रपट त्यांच्यावर नावावर आहेत. प्रकाश आणि उमा यांचा भालू हा चित्रपटही खूप गाजला. पी सावळाराम गंगा-जमुना पुरस्कार, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा पुरस्कार, महाराष्ट् सरकारचा व्ही. शांताराम पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -