घरमुंबईपश्चिम रेल्वेची १५ दिवसांची जनजागृती मोहीम

पश्चिम रेल्वेची १५ दिवसांची जनजागृती मोहीम

Subscribe

एक्स्प्रेसमधून जादा सामान नेण्यास बंदी

एक्स्प्रेस रेल्वेमधून लांब पल्याचा प्रवास म्हटलं की, सामानाची ओझी घेऊन इतर प्रवाशांची गैरसोय करणारे प्रवासी तुम्हाला आठवत असतील. आपल्या ओझ्यामुळे इतर प्रवाशांना त्रास होऊ शकतो, याची साधी जाणीवही या प्रवाशांना नसते. ही जाणीव करुन देण्याची जबाबदारी पश्चिम रेल्वेने आता स्वतः उचलली आहे. नियमापेक्षा अधिक सामान प्रवाशांना नेता येणार नाही, या नियमाची माहिती करुन देण्यासाठी पश्चिम रेल्वेतर्फे ८ ते २२ जून दरम्यान विशेष जनजागृती मोहिम हाती घेतली आहे. समुपदेशनाच्या माध्यमातून नियमांविषयी संपूर्ण माहिती प्रवाशांना दिली जाणार आहे. त्याचबरोबर प्रवाशांनी किमान मर्यादेपेक्षा जास्त सामान न नेण्याचे आवाहन देखील पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. यापुढे अधिक सामान घेऊन जाणाऱ्या प्रवाशांवर काही प्रमाणात नक्कीच चाप बसेल.

विमानाप्रमाणे रेल्वेत देखील अधिक सामान नको

- Advertisement -

मेल किंवा एक्स्प्रेसमधून प्रवास करताना नियमापेक्षा अधिक सामान नेल्यास प्रवाशांवर कारवाई करण्यात येते. परंतु याकडे अनेक प्रवासी पूर्णत: दुर्लक्ष करतात. नियमापेक्षा अधिक सामान गाडीत आणल्यास अतिरिक्त शुल्क भरण्याचा नियम असताना अनेक प्रवासी शुल्क देण्यास नकार देतात. यामुळे अनेक वेळा सामानावरुन प्रवाशांमध्ये वाद होत असतात. मात्र या कटकटीला पश्चिम रेल्वेच्या पुढाकारामुळे आळा बसणार आहे. कारण आता विमानाप्रमाणेच रेल्वेत देखील अधिक सामान घेऊन जाता येणार नाही. कोणत्याही प्रवाशांनी जबरदस्तीने जादा सामान घेऊन जाणाच्या प्रयत्न केल्यास त्या प्रवाशांवर योग्य ती कारवाई केली जाणार आहे.

सामान किती असावे याची निश्चिती

- Advertisement -

रेल्वेच्या नियमानुसार आता श्रेणीनुसार सामानाचे वजन निश्चित केले जाणार आहे. कमाल वजनापर्यंत सूट दिली जाणार असून त्यापेक्षा जादा वजनाच्या सामानासाठी अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे.

वर्ग                                  वजनाची मर्यादा

वातानुकुलीत प्रथम श्रेणी               ८५ किलो
वातानुकुलीत द्वित्तीय श्रेणी              ६० किलो
वातानुकुलीत तृत्तीय श्रेणी              ५० किलो
स्लीपर श्रेणी                           ५० किलो

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -