मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी

मंत्रालयात आलेल्या या निनावी पत्राने खळबळ उडाली आहे. मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी तक्रार नोंदवण्यात आली आहे.

Mumbai
we will make happy life of flood affected peoples says cm devendra fadnavis
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यात विधानसभा निवडणुकीचा माहौल आहे. सर्वच पक्ष प्रचारात व्यस्त आहेत. यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निनावी पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. मंत्रालयात आलेल्या या निनावी पत्राने खळबळ उडाली आहे. मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी तक्रार नोंदवण्यात आली आहे. हे पत्र कुठून आले? कोणी पाठवले? याबाबत पोलीस चौकशी करत आहेत.

यापूर्वीसुद्धा मिळाले होते धमकीचे पत्र

मुख्यमंत्री कार्यालयात शुक्रवारी एक निनावी पत्र सापडले. या पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या पत्रामुळे मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या कार्यालयाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. गृहमंत्रालयाने याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे. धमकीचे पत्र पाठवणाऱ्या व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात सुद्धा जीवे मारण्याची धमकी मिळाली होती.