घरमुंबईउल्हासनगर पालिकेत राडा; आयुक्तांविरोधात नगरसेवकांचा पालिकेतच ठिय्या!

उल्हासनगर पालिकेत राडा; आयुक्तांविरोधात नगरसेवकांचा पालिकेतच ठिय्या!

Subscribe

उल्हास नगर महानगर पालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याविरोधा नगरसेवकांनी वातावरण तापवायला सुरुवात केली असून त्यांना माघारी पाठवण्याची मागणी करण्यासाठी मंगळवारी नगरसेवकांनी सभागृहाच्या लॉबीमध्येच ठिय्या मांडला.

उल्हासनगर महापालिकेचे मागील आयुक्त अच्युत हांगे यांनी मान्यता दिलेली १६ कोटी रुपयांची विकासकामं विद्यमान पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी रद्द केली आहेत. याचे पडसाद मंगळवारी महापालिकेत बघायला मिळाले. पालिकेत नगरसेवकांनी महापौर लॉबीमध्ये ठिय्या आंदोलन करत निषेध केला. दोन महिन्यांपूर्वी उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार सुधाकर देशमुख यांनी स्विकारला. त्यांच्या पूर्वी पालिका आयुक्त पद हे अच्युत हांगे यांच्याकडे होते. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात सुमारे १०० कोटी रुपयांच्या विकासकामांना मान्यता दिली. पालिकेच्या तिजोरीची अवस्था दयनीय असतानाही या अवाच्या सव्वा विकासकामांना परवानगी दिली असल्याची बाब आयुक्त सुधाकर देशमुख यांना समजली. त्यांनी लेखा विभागाकडून पालिकेच्या आर्थिक स्थितीबाबत अहवाल मागवला. त्यावेळी १०० कोटींपेक्षा अधिक ठेकेदारांची देणी असल्यामुळे त्यांनी १६ कोटी रुपयांची सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पाणी पुरवठा विभागाची कामे रद्द केली. सार्वजनिक बांधकाम विभागातील कामांमध्ये रस्ते दुरुस्ती, शौचालय निर्माण आणि दुरुस्ती, गटारांची दुरुस्ती आदी कामांचा समावेश आहे.

नगरसेवकांनी लॉबीमध्ये मारला ठिय्या

ही विकासकामे रद्द करून पालिका आयुक्तांनी थेट नागरसेवकांशी पंगा घेतला. त्याचे फलित मंगळवारच्या महासभेत पाहण्यास मिळाला. नगरसेवक सुनिल सुर्वे, किशोर वनवारी, ज्योत्स्ना जाधव, मीना सोंडे, राजश्री चौधरी, सतरामदास जेसवानी, सुनीता बगाडे आदी नगरसेवकांनी आयुक्तांच्या निर्णयाचा समाचार घेत महापौरांच्या समोरील लॉबीमध्ये बैठक मारली. यावेळी स्वीकृत नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांनी थेट ‘पालिका आयुक्तांना शासन दरबारी माघारी पाठवा’, असा ठराव महासभेत करण्याची मागणी केली.

- Advertisement -

हेही वाचा – उल्हासनगरमधील धोकादायक ‘केसवानी कॉम्प्लेक्स’ रिकामी केली

‘आयुक्त असताना चर्चा करू’

मात्र, हा सगळा राडा झाला, तेव्हा पालिका आयुक्त सुधाकर देशमुख हे मंत्रालयात काही कामासाठी गेल्यामुळे गैरहजर होते. त्यामुळे ह्या विषयावर ‘आयुक्त देशमुख असताना चर्चा करू’ असे सांगत महापौर पंचम कलानी यांनी विषय संपवला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -