घरमुंबईअधिवेशनाला येणाऱ्या आमदारांना चोरीचा फटका; एक्स्प्रेसमधून पत्नीची पर्सच पळवली

अधिवेशनाला येणाऱ्या आमदारांना चोरीचा फटका; एक्स्प्रेसमधून पत्नीची पर्सच पळवली

Subscribe

विदर्भ एक्स्प्रेसमध्ये चक्क आमदाराच्या वस्तूंची चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काँग्रेस आमदार राहुल बोंद्रे यांच्या पत्नीची पर्स एक्स्प्रेसमधून चोरीला गेली आहे.

विदर्भ एक्स्प्रेसमध्ये चक्क आमदाराच्या वस्तूंची चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आमदार राहुल बोंद्रे यांच्या पत्नी पर्स एक्स्प्रेसमधून चोरीला गेली आहे. याबाबतची माहिती पावसाळी अधिवेशनात स्वतः आमदार राहुल बोंद्रे यांनी दिली. सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असून, ग्रामीण भागातील आमदार मुंबईमध्ये अधिवेशनासाठी आले आहेत. अधिवेशनासाठी एक्स्प्रेसने मुंबईला येणाऱ्या आमदारांच्या बॅगांवर चोरांनी डल्ला मारला. काल, सोमवारी देवगिरी एक्स्प्रेसमध्ये शिवसेनेच्या दोन तर आज मंगळवारी राहुल बोंद्रे यांना चोरांनी लुटले आहे. याबाबत लोहमार्ग पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

आमदार राहुल बोंद्रे यांनी सांगितला चोरीचा घटनाक्रम

आमदार राहुल बोंद्रे यांनी सांगितला चोरीचा घटनाक्रम

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ಜೂನ್ 24, 2019

- Advertisement -

काय आहे प्रकरण 

राहुल बोंद्रे हे बुलढाण्यातील चिखली मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार आहेत. अधिवेशनासाठी मुंबईला येताना चोरांनी आमदारांच्या सामनाची चोरी केली. त्यानंतर कल्याण स्थानकावरून राहुल बोंद्रे यांच्या पत्नीची पर्स घेऊन चोर पसार झाला. आमदार राहुल बोंद्रे यांनी चोराला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र चोर पळून गेला. पर्समध्ये २६ हजारांची रोख रक्कम, एटीएम कार्ड आणि महत्वाची कागदपत्रे होती. सकाळी सहा वाजता विदर्भ एक्स्प्रेस कल्याण स्थानकावर आल्यानंतर ही घटना घडली आहे. राहुल बेंद्रे यांच्या पत्नीने तात्काळ मध्य रेल्वेच्या सीएसएमटी लोहमार्ग पोलिसांत याबाबतची तक्रार दिली आहे. अधिवेशनासाठी विशेष असणाऱ्या बोगीमधून चोरी झाल्यामुळे राहुल बोंद्रे, शशिकांत खेडेकर आणि संजय रायमुलकर यांनी सीएसएमटी लोहमार्ग पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

आम्ही अधिवेशनसाठी विदर्भ एक्स्प्रेस या गाडीने पत्नीसोबत येत असताना गाडी कल्याण स्टेशनवर थांबली असताना आमदारासाठी राखीव असलेल्या बोगीमध्ये एक चोर शिरला. तो माझ्या पत्नीची पर्स चोरून धावू लागला. मी व माझ्यासोबत दोन पोलीस यांनी त्याचा पाठलाग केला. मात्र चोर पळून जाण्यात यशस्वी ठरला. या घटनेबाबत छत्रपती शिवाजी टर्मिनल येथील रेल्वे पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेला २४ तासापेक्षाही जास्त कालावधी झाला आहे. तसेच हा मुद्दा सभागृहातही उपस्थीत केला. पंरतू अजूनही कोणतीही कारवाई झालेली नाही. राज्यात ज्या ठिकाणी आमदार सुरक्षित नाही तेथे सामान्य नागरीक कसा सुरक्षित राहील. युती सरकारचे हेच अच्छे दिन आहेत का? चोरांना अच्छे दिन आले की काय असा प्रश्न आहे, ही अतिशय गंभीर घटना आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
– राहुल बोंद्रे , आमदार, काँग्रेस

- Advertisement -

 

शिवसेना आमदार संजय रायमुलकर

शिवसेना आमदार संजय रायमुलकर

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ಜೂನ್ 24, 2019

आम्ही २३ जून रोजी देवगीरी एक्सप्रेस या गाडीने जालना ते मुंबई असा प्रवास करत असताना सकाळी ६ ते ६.३० दरम्यान कल्याण-ठाणे दरम्यान आमच्या बोगीमध्ये अज्ञात चोरट्याने प्रवेश करुन माझा मोबाईल, पैसे, शर्ट आणि विधान भवनचे ओळखपत्र याची चोरी केली. ही घटना माझ्यासोबत प्रवास करणारे माझे सहकारी आमदार शशिकांत खेडकर यांनी सांगितली असता त्यांनी त्याच्या पीएची बॅग कापल्याचे सांगितले. या प्रकाराबाबत सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणे येथे तक्रार नोंदवण्यात आली आहे.
– संजय रायमुलकर, आमदार, शिवसेना

हेही वाचा –

दादरमध्ये चक्क भाजी विक्रेत्याने केला ग्राहकाचा खून; विक्रेत्याला अटक

मीरा रोडमध्ये घरात आढळला मायलेकाचा मृतदेह

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -