घरमुंबईमुंबईत उद्या 'या' विभागात पाणी पुरवठा राहणार बंद!

मुंबईत उद्या ‘या’ विभागात पाणी पुरवठा राहणार बंद!

Subscribe

मुंबई शहरात राहणाऱ्या नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. मुंबईत उद्या ११ नोव्हेंबर रोजी काही ठिकाणी पाणी पुरवठा होणार नाही. सकाळी १० ते रात्री ८ दरम्यान पाणी पुरवठा बंद राहणार असून जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी मुंबईतील सात विभागांचा पाणी पुरवठा उद्या बंद करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. तर १२ नोव्हेंबर रोजी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरावे असे आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आले आहे.

पालिकेतर्फे नागरिकांना आवाहन

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महानगरपालिकेतर्फे १८०० मिमी व्‍यासाच्‍या मुख्‍य जलवाहिनीमध्ये सुमननगर जंक्‍शनजवळ गळती झाल्याचे आढळून आले होते. ही गळती बंद करण्‍याचे काम ११ नोव्‍हेंबर २०२० रोजी सकाळी १० ते रात्री ८ या वेळेमध्‍ये हाती घेण्‍यात येणार आहे. त्यामुळे काही महापालिकेच्या सात विभागांमधील काही परिसरात पाणीपुरवठा बंद राहिल. तसेच १२ नोव्‍हेंबर २०२० रोजी काही विभागात पाणीपुरवठा कमी दाबाने होईल, असे महापालिकेतर्फे सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

नागरिकांनी आज आणि उद्या पाण्‍याचा साठा करुन ठेवावा तसेच पाणी पुरवठा सुरळीत होईपर्यंत पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन मुंबई महापालिकेने केलं आहे. याशिवाय नागरिकांनी या दोन्‍ही दिवशी रोजी पाणी गाळून आणि उकळून प्‍यावे, असेही सांगितले आहे.

‘या’ विभागात पाणी पुरवठा राहणार बंद

  • एम पूर्व : ट्रॉंबे निम्‍नस्‍तर जलाशयावरील सी.जी. गिडवाणी मार्ग, रामकृष्‍ण चेंबूरकर मार्ग, सह्याद्री नगर, कस्‍तुरबा नगर, अजिज बाग, अयोध्‍या नगर, म्‍हाडा कॉलनी, भारत नगर, आणिक गाव, विष्‍णू नगर, प्रयागनगर आणि गवाण पाडा
  • एम पश्चिम : साई बाबा नगर, शेल कॉलनी, सिध्‍दार्थ कॉलनी, पोस्‍टल कॉलनी, एचपीसीएल, बीपीसीएल, आरसीएफ, बीपीटी, टाटा पावर, रामकृष्‍ण चेंबूरकर मार्गावरील मारवाली चर्च, आंबापाडा, माहूल गाव, म्‍हैसुर कॉलनी, वाशी गाव, माहूल पीएपी, मुकुंद नगर एसआरए, लक्ष्‍मी नगर, कलेक्‍टर कॉलनी, सिंधी सोसायटी, चेंबुर कॅंम्‍प तसेच चेंबुर नाका ते सुमननगर मधील सायन-ट्रॉबे मार्गालगतचा भाग
  • एफ दक्षिण : परळ गाव, शिवडी पश्चिम आणि पूर्व, हॉस्पिटल झोन, काळे वाडी
  • एफ उत्तर : कोकरी आगार, ऍन्टोपहील, वडाळा, गेट क्र. ४, कोरबा मिठागर, बीपीटी
  • बी विभाग : डोंगरी ए झोन, वाडी बंदर, सेंन्‍ट्रल रेल्‍वे झोन, बीपीटी झोन,
  • ई विभाग : डॉकयार्ड झोन, हाथीबाग व हुसैन पटेल मार्ग आणि माऊंट रोड झोन, जे.जे. हॉस्पिटल
  • ए विभाग : नेवल डॉक आऊटलेट झोन, सेंट जॉर्ज हॉस्पिटल
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -