घरमुंबईग्रीन प्लॅनेटसाठी महाराष्ट्राकडे जगाचे नेतृत्त्व

ग्रीन प्लॅनेटसाठी महाराष्ट्राकडे जगाचे नेतृत्त्व

Subscribe

जिल्हा परिषदेतील शिक्षकाची कामगिरी ,11 देशांतील 104 शाळांमधील मुलांचा पुढाकार

दरवर्षी पावसाळ्यात होणार्‍या वृक्ष लागवडीनंतर रोपांची योग्य निगा न राखल्याने अनेक झाडे मरतात. त्यामुळे योग्य ठिकाणी नियोजनबद्ध वृक्ष लागवडीच्या माध्यमातून गावामध्ये 33 टक्के वनक्षेत्र निर्माण करण्यासाठी सोलापूरमधील जिल्हा परिषदेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ‘ग्रीन प्लॅनेट’ हा उपक्रम हाती घेतला आहे. उपक्रमाला देशातीलच नव्हे तर 11 देशातील 104 शाळांमधील शिक्षकांकडून प्रतिसाद मिळाला आहे. वृक्ष लागवडीच्या या उपक्रमावर महाराष्ट्रासह 11 देशांमध्ये काम सुरू आहे.

पर्यावरणाचे संवर्धन करणे हे सध्या सार्‍या जगापुढील एक मोठे आव्हान आहे. त्यादृष्टीकोनातून प्रत्येक देश प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र सरकारही दरवर्षी कोट्यवधी रोपांची लागवड करते.

- Advertisement -

परंतु ही लागवड करताना कोणत्या जमिनीमध्ये कोणते रोप लावले पाहिजे. किती रोपे लावले पाहिजेत याकडे कोणीही लक्ष देत नाही. त्यामुळे दरवर्षी हजारो रोपे लावूनही काहीच फायदा होत नसल्याने रणजितसिंह डिसले यांनी नियोजनबद्ध वृक्षलागवडीसाठी ‘ग्रीन प्लॅनेट’ हा शैक्षणिक उपक्रम हाती घेतला आहे. डिसले यांनी पाच वर्षे स्वत:च्या गावात उपक्रम राबवल्यानंतर त्याची माहिती सोशल माध्यमातून प्रसिद्ध करून उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन शिक्षकांना केले. ग्रीन प्लॅनेट उपक्रमाचा उद्देश पाहून 11 देशांतील शिक्षकांनी पुढाकार घेतला. या उपक्रमाला भारतासह 11 देशांतील 104 शाळांमध्ये 15 ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. नियोजनबद्ध वृक्षलागवडीसाठी गावाचे पर्यावरण रिपोर्ट कार्ड तयार करणे, गावचा ग्रीन मॅप तयार करणे, गावातील वनखालील क्षेत्र मोजणे, झाडांचे वय काढणे आदी कृतींचा समावेश आहे.

प्रकल्पात सहभागी देश
अझरबैजान, बांग्लादेश, ब्राझील, कमेरून , जॉर्जिया, ग्रीस, भारत, इस्त्रायल, नायजेरिया, युक्रेन, अमेरिका, व्हिएतनाम
प्रकल्पात सहभागी जिल्हे परभणी, उस्मानाबाद, चंद्रपूर, भंडारा, नांदेड, सोलापूर, ठाणे, यवतमाळ, बुलढाणा, रायगड, बीड, नाशिक, पुणे, लातूर, जालना, नागपूर, अमरावती, जळगाव, वर्धा

- Advertisement -

कसा बनवणार कृती आराखडा
‘ग्रीन प्लॅनेट’अंतर्गत विद्यार्थ्यांकडून गावातील पर्यावरणपूरक व हानी करणार्‍या घटकांची आकडेवारी गोळा करणे. गावाची लोकसंख्या, झाडांची संख्या, मोबाईल, टीव्ही, गाड्या, गॅस कनेक्शन, चुलीवर स्वयंपाक करणार्‍या कुटुंबांची संख्या, गावाचे क्षेत्रफळ, पाण्याचे स्त्रोत, झाडांची माहिती घेऊन ग्रीन मॅप बनवण्यात येणार आहे. वन क्षेत्र व प्रदूषणाच्या पातळीचा अभ्यास करून पर्यावरण रिपोर्ट कार्ड बनवून त्यावर पर्यावरण तज्ज्ञांशी चर्चा करून सरसकट वृक्षारोपण न करता वनक्षेत्रानुसार कोठे, कोणती व किती झाडे लावली पाहिजेत, याचा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांमार्फत वृक्षलागवडीचा कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. हा आराखडा गावच्या सरपंचाना सरपंचना सादर केला जाणार आहे.

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -