घरनवी मुंबईस्वबळाचा नारा देत नवी मुंबई महापालिकेसाठी 'मनसे' मैदानात

स्वबळाचा नारा देत नवी मुंबई महापालिकेसाठी ‘मनसे’ मैदानात

Subscribe

राज्यात सध्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. आगामी काळात होणारी नवी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दंड थोपटले असून पालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार आहे. नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीने जोरदार तयारी सुरू केलेली असतानाच या निवडणुकीत चमत्कार घडवून आणण्यासाठी मनसेनेही कंबर कसली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजाव आणि मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते रविवारी नवी मुंबईतील तीन शाखांचे उद्घाटन करण्यात आलं. यावेळी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची माहिती दिली.

नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली असून वेगवेगळे डावपेच आजमावून बघत आहेत. त्यामुळे आता मनसेने देखील तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठीच राज ठाकरे यांनी अमित ठाकरे यांना पालिका निवडणुकीच्या आखाड्यात उतरवल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे अमित ठाकरे यांच्या कामगिरीवर साऱ्यांचं लक्ष असणार आहे. अमित ठाकरे यांनी रविवारी पक्षाच्या तीन शाखांचं उद्घाटन केलं. त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नवी मुंबई राजकीय वर्तुळातील सद्यस्थिती, तेथील राजकीय वातावरण आणि उमेदवारांची तयारी या सगळ्याचा त्यांनी आढावाही घेतल्याचं म्हटलं जात आहे.

- Advertisement -

राज ठाकरेंच्या सुरक्षेत कपात

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने राज्यातील बड्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली आहे. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील झेड सिक्युरीटी काढण्यात आली असून आता राज ठाकरे यांना वाय प्लस (y+) सुरक्षा देण्यात येईल. यावरुन मनसेचे आमदारा राजू पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे. “मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत कपात केली. त्यांची झेड सिक्युरिटी काढली. मात्र, सुरक्षा काढली जरी असली तरी त्याचा आम्हाला काही फरक पडत नाही. ठाकरे सरकार हे जाणीवपूर्वक राजकारण करत आहे. राज ठाकरे यांच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र आहे. राज ठाकरे यांना मनसे सैनिक सुरक्षा पुरवतील,” असं राजू पाटील म्हणाले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -