पहा : निसर्ग चक्रीवादळाचा मुंबईवरही परिणाम

महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळ धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबईपासून ६०० किलोमीटरपर्यंत याचा प्रभाव होईल, असे देखील सांगण्यात आले आहे. तसेच याचा फटका पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, हरिहरेश्वर या ठिकाणी बसण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर कोकणातही जोरदार पाऊस होईल, असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मासेमारीचा व्यवसाय करणाऱ्यांनी सुरक्षेकरता आपल्या बोटी किनाऱ्याला आणून बांधल्या आहेत. (फोटो : दिपक साळवी)

cyclone nisarga mumbai on high alert ndrf teams deployed at maharashtra
निसर्ग चक्रीवादळाचा मुंबईवरही परिणाम