Photo: आजपासून महिलांसाठी पुन्हा लोकल ट्रेन सुरू

राज्य सरकारने आजपासून सर्वसामान्य महिलांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. मात्र त्यासाठी ठराविक वेळेची मर्यादा आखून दिली आहे. दादर स्थानकावर लॉकडाऊननंतर आज महिलांनी लोकल प्रवास सुरू केला. मात्र यावेळी महिलांची तुरळक गर्दी पाहायला मिळाली.