Photo – मायानगरीत Power Cut; शहरात अशी झाली होती स्थिती!

मुंबईत अनेक भागात आज, सोमवारी सकाळी वीज पुरवठा खंडित झाला. मुंबईतील दहीसर, चेंबूर, प्रभादेवी, मालाड, कांदिवली, बांद्रा, विले पार्ले, पवई या भागात वीज पुरवठा खंडीत झाला. टाटाकडून होणाऱ्या विद्युत पुरवठ्यात बिघाड झाल्यामुळे वीज पुरवठा खंडीत झाले असल्याचे ट्विट बेस्टकडून करण्यात आले आहे. याचा परिणाम शहरातील काही भागांवर तसेच सेवांवर झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. रेल्वे, दुकाने, कार्यालये यांचे कामकाज ठप्प झाले. तर एसी बससाठी प्रवाशांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. मायानगरीत काही तासांसाठी झालेल्या पॉवर कटमुळे मुंबई अशी दिसू लागली. (सर्व छाया - दीपक साळवी)

छाया - दीपक साळवी