सुंदर ते ध्यान उभे विटेवरी…

विठ्ठल नामाच्या गजरात दुमदुमली पंढरी

Pandharpur

आषाढी एकादशीच्या निमित्ताने अवघे पंढरपुर भक्ती सागरात तल्लीन झाले आहे. आज पहाटे पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्र्यांनी सपत्नी श्री विठ्ठल – रुख्मिणीचे दर्शन घेत शासकीय महापूजा केली असून मुख्यमंत्र्यांसोबत लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातील सांगवी सुनेवाडी तांडा या गावाचे वारकरी विठ्ठल चव्हाण आणि प्रयाग चव्हाण या दाम्पत्यांना पूजेचा मान मिळाला आहे.