घरक्रीडाअजिंक्य रहाणेनं केला तीन हजार धावांचा टप्पा पूर्ण

अजिंक्य रहाणेनं केला तीन हजार धावांचा टप्पा पूर्ण

Subscribe

आपलं अर्धशकत पूर्ण करत अजिंक्य रहाणेनं टेस्ट क्रिकेटमध्ये आपल्या ३००० रन्स पूर्ण केल्या आहेत. ८१ व्या इनिंगमध्ये अजिंक्यनं या रन्स पूर्ण केल्या आहेत.

इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारतीय क्रिकेट टीमचा उप कॅप्टन अजिंक्य रहाणे पुन्हा एकदा फॉर्ममध्ये दिसून आला आहे. तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये सर्वात जास्त गरज असताना अजिंक्यनं भारतीय कॅप्टन विराट कोहलीबरोबर १५९ रन्सची भागीदारी करून टीमला एक लक्ष्य साधून दिलं आहे. अजिंक्य बॅटिंग करायला आला त्यावेळी भारताची स्थिती ८२ रन्सवर ३ विकेट अशी होती. त्यानंतर मात्र कोहली आणि अजिंक्यनं भागीदारी करत भारताचा डाव सावरला. तर हा डाव सावरत असताना आपलं अर्धशकत पूर्ण करत रहाणेनं टेस्ट क्रिकेटमध्ये आपल्या ३००० रन्सदेखील पूर्ण केल्या आहेत. पहिल्या दोन्ही सिरीजमध्ये रहाणे अयशस्वी राहिला होता. मात्र या टेस्ट मॅचमध्ये पुन्हा एकदा आपण फॉर्ममध्ये असल्याचं रहाणेनं सिद्ध केलं आहे.

- Advertisement -

रहाणेच्या तीन हजार रन्स पूर्ण

रहाणेनं आपलं अर्धशतक ७६ बॉल्समध्ये सात फोर्सच्या मदतीनं पूर्ण केलं. तर ५९ व्या ओव्हरमध्ये ब्रॉडला फोर मारत त्यानं आपल्या टेस्ट मॅच क्रिकेट करिअरमधील तीन हजार रन्सदेखील पूर्ण केल्या. यामध्ये ९ शतक आणि १३ अर्धशतकांचा समावेश आहे. ८१ व्या इनिंगमध्ये ३००० रन्सचा आकडा त्यानं गाठला आहे. ४८ व्या टेस्टमध्ये त्यानं या रन्स पूर्ण केल्या आहेत. रहाणेप्रमाणेच टीम इंडियाचे माजी क्रिकेटर गुंडप्पा विश्वनाथ यांनीही ८१ इनिंग्जमध्ये ३००० रन्स पूर्ण केल्या होत्या. दिलीप वेंगसरकर आणि विजय मांजरेकर यांनी ८८ व्या इनिंगमध्ये या टप्पा पूर्ण केला होता. दरम्यान या टेस्टमध्ये रहाणेनं ८१ रन्स बनवून आऊट झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -