Sunday, August 9, 2020
Mumbai
29.1 C
घर क्रीडा धोनीने वरच्या क्रमांकावर खेळावे अशी इच्छा होती!

धोनीने वरच्या क्रमांकावर खेळावे अशी इच्छा होती!

धोनी सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक आहे, असे भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला वाटते. 

Kolkata
धोनी आणि गांगुली 

भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज महेंद्रसिंग धोनी हा केवळ सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक नाही, तर क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट फिनिशर्सपैकी एक मानला जातो. त्याने अखेरच्या षटकांत फटकेबाजी करत अनेकदा भारतीय संघाला अशक्यप्राय वाटणारे विजय मिळवून दिले आहेत. परंतु, त्याने वरच्या क्रमांकावर फलंदाजी केली असती, तर तो कदाचित अधिक यशस्वी झाला असता असे भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीला वाटते.

धोनी सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक

धोनी हा क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट फिनिशर्सपैकी एक मानला जातो. मात्र, फिनिशरच नाही, तर धोनी सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक आहे. मधल्या फळीत किंवा खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन धोनी कशाप्रकारे सामने जिंकवतो याबाबत बरीच चर्चा केली जाते. मात्र, तो फारच विस्फोटक फलंदाज असल्याने वरच्या क्रमांकावर अधिक यशस्वी झाला असता असे मला वाटते. त्याने वरच्या क्रमांकावर खेळावे अशी माझी नेहमी इच्छा होती, असे गांगुली म्हणाला. धोनीचा काल ३९ वा वाढदिवस होता. त्यानिमित्तानेच गांगुली बोलत होता.