घरक्रीडाअमलराज, सुतिर्थाला सुवर्ण

अमलराज, सुतिर्थाला सुवर्ण

Subscribe

अँथनी अमलराज आणि सुतिर्था मुखर्जी या भारतीय खेळाडूंनी दक्षिण आशियाई स्पर्धेच्या टेबल टेनिसमध्ये अनुक्रमे पुरुष आणि महिला गटात सुवर्णपदक पटकावले. या दोघांनीही अंतिम सामन्यात भारतीय खेळाडूंनाच पराभूत केले. त्यामुळे भारताला दोन्ही गटांमध्ये सुवर्णसोबतच रौप्यपदकही मिळाले. भारतीय टेबल टेनिसपटूंनी दक्षिण आशियाई स्पर्धेत सात सुवर्ण आणि पाच रौप्यपदकांची कमाई केली.

पुरुषांच्या अंतिम सामन्यात अँथनी अमलराजने हर्मित देसाईचा पराभव केला. या सामन्याचे पहिले तीन सेट अँथनीने गमावले होते, पण त्यानंतर त्याने आपल्या खेळात सुधारणा करत सामन्यात दमदार पुनरागमन केले. त्याने हा सामना ६-११, ९-११, १०-१२, ११-७, ११-४, ११-९, ११-७ असा जिंकला.

- Advertisement -

महिलांच्या अंतिम सामन्यात सुतिर्थाला भारताच्याच अहिका मुखर्जीने चांगली झुंज दिली. मात्र, सुतिर्थाने हा सामना ८-११, ११-८, ६-२१, ११-४, १३-११, ११-८ असा जिंकत सुवर्णपदक मिळवले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -