घरक्रीडावर्ल्डकपसाठी आर्चर इंग्लंड संघात नाही

वर्ल्डकपसाठी आर्चर इंग्लंड संघात नाही

Subscribe

वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरची पुढील महिन्यात सुरू होणार्‍या क्रिकेट विश्वचषकासाठी इंग्लंडच्या संघात निवड होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, इंग्लंडच्या निवड समितीने त्याचा विश्वचषकासाठीच्या संघात समावेश केलेला नाही. इंग्लंडने बुधवारी या संघाची घोषणा केली. आर्चरची विश्वचषकासाठी जरी निवड झाली नसली तरी त्याआधी होणार्‍या आयर्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यासाठी तसेच पाकिस्तानविरुद्धच्या टी-२० आणि ५ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी त्याचा इंग्लंड संघात समावेश करण्यात आला आहे.

बार्बाडोसमध्ये जन्मलेला आर्चर मागील महिन्यात इंग्लंडकडून खेळण्यासाठी पात्र झाला आहे. मात्र, एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेल्या आर्चरची थेट विश्वचषकासाठी निवड व्हावी की नाही, याबाबत इंग्लंडमध्ये बराच वादविवाद सुरू होता. राजस्थान रॉयल्स संघाकडून आयपीएलमध्ये खेळणार्‍या आर्चरने मागील २-३ वर्षांत स्थानिक क्रिकेट आणि विविध देशांमधील टी-२० स्पर्धांत चांगली कामगिरी केली आहे.

- Advertisement -

मात्र, विश्वचषकासाठी त्याच्याऐवजी १३ एकदिवसीय, २ कसोटी आणि १० टी-२० सामन्यांचा अनुभव असलेल्या टॉम करनची निवड झाली आहे. तसेच २००९ मध्ये आपला अखेरचा एकदिवसीय सामना खेळणार्‍या जो डेंलीलाही या संघात स्थान मिळाले आहे. हा विश्वचषक त्यांच्याच घरच्या मैदानावर होणार असल्याने इंग्लंडला ही स्पर्धा जिंकण्याचे प्रमुख दावेदार मानले जात आहे.

इंग्लंड संघ : इयॉन मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, जॉनी बेअरस्टोव, अ‍ॅलेक्स हेल्स, जो रूट, जॉस बटलर (यष्टीरक्षक), बेन स्टोक्स, क्रिस वोक्स, जो डेंली, मोईन अली, आदिल रशीद, लियाम प्लंकेट, टॉम करन, डेविड विली, मार्क वूड.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -