घरक्रीडाएटीपी सिनसिनाटी मास्टर्स टेनिस स्पर्धा : फेडररला नमवत जोकोविच विजयी

एटीपी सिनसिनाटी मास्टर्स टेनिस स्पर्धा : फेडररला नमवत जोकोविच विजयी

Subscribe

अमेरिकेत पार पडलेल्या एटीपी सिनसिनाटी मास्टर्स टेनिस स्पर्धेत रॉजरला सर्बियाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने नमवत स्पर्धेत विजय मिळवला आहे.

टेनिसचा अनभिषिक्त सम्राट रॉजर फेडररला अमेरिकेत पार पडलेल्या एटीपी सिनसिनाटी मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभवाला सामोरं जाव लागले आहे. त्याला २०१८ विम्बल्डन विजेता नोव्हाकने नमावले आहे. नोव्हाकला ६-४, ६-४ अशा सरळ सेट्समध्ये फेडररचा पराभव केला आहे. सर्बियाचा स्टार खेळाडू नोव्हाकने सेमी फायनलमध्ये मारिन सिलिकचा ६-४, ३-६, ६-३ अशा तीन सेटमध्ये पराभव करत अंतिम सामन्यात झेप घेतली होती. तर दुसऱ्या सेमी फायनलच्या सामन्यात बेल्जियमचा खेळाडू डेविड गोफिन खेळू न शकल्याने रॉजरलाही थेट अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला होता. विशेष म्हणजे नोव्हाकने १९९० पासून सुरु असलेल्या मास्टर्स प्रकारातील सर्व स्पर्धा जिंकण्याचा एक अनोखा विक्रमही आहे.

- Advertisement -

असा झाला सामना

जागतिक क्रमवारीमध्ये दुसऱ्या क्रमांकावरील रॉजर आणि १०व्या क्रमांकावर असणाऱ्या जोकोविच यांच्यातील सामन्यात दोघेही खेळाडू आपआपला खेळ उंचावण्याचा प्रयत्न करताना दिसून येत होते. पहिल्या सेटमध्ये सुरूवातीपासूनच रॉजरने आक्रमक खेळ दाखवला मात्र नोव्हाकच्या संयमी खेळासमोर रॉजरला ६-४ च्या फरकाने पराभव पत्करावा लागला. त्यानंतर दुसऱ्याही सेटमध्ये नोव्हाकने ६-४ च्याच फरकाने नमवत सामना आपल्या नावे केला आणि विजेतेपदावर आपले नाव कोरले.

किकि बर्टेंस महिला एकेरीत विजयी

पुरूष एकेरीत नोव्हाकने विजय मिळवल्यानंतर महिला एकेरी रोमच्या सिमोना हालेपला पराभूत करत एटीपी सिनसिनाटी मास्टर्स स्पर्धेत विजय मिळवला. पहिल्या सेटमध्ये सिमोनाने अप्रतिम खेळ दाखवत २-६ च्या फरकाने विजय मिळवला मात्र त्यानंतर किकिने आपला खेळ उंचवत ७-६ च्या फरकाने विजय मिळवला आणि अखेरच्या सेटमध्ये ६-२ च्या किकिने विजय मिळवत सामना आपल्या नावे केला.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -