घरक्रीडाIND vs AUS : ब्रिस्बन कसोटी रंगतदार स्थितीत; भारताला विजयासाठी ३२८ धावांचे लक्ष्य  

IND vs AUS : ब्रिस्बन कसोटी रंगतदार स्थितीत; भारताला विजयासाठी ३२८ धावांचे लक्ष्य  

Subscribe

सिराज (७३ धावांत ५ विकेट) आणि शार्दूल (६१ धावांत ४ विकेट) यांनी अप्रतिम गोलंदाजी केली. 

मोहम्मद सिराज आणि शार्दूल ठाकूर या वेगवान गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना रंगतदार स्थितीत आहे. चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २९४ धावांत आटोपल्याने भारताला निर्णायक कसोटी जिंकण्यासाठी ३२८ धावांचे आव्हान मिळाले. याचा पाठलाग करताना दिवसअखेर भारताची बिनबाद ४ अशी धावसंख्या होती. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात सिराज (७३ धावांत ५ विकेट) आणि शार्दूल (६१ धावांत ४ विकेट) यांनी अप्रतिम गोलंदाजी केली.

वॉर्नरची आक्रमक फलंदाजी

ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवशी बिनबाद २१ वरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. अनुभवी सलामीवीर डेविड वॉर्नरने चांगली फलंदाजी करत ७५ चेंडूत ४८ धावांची खेळी केली. त्याला मार्कस हॅरिसची (३८) उत्तम साथ लाभली. या दोघांनी ८९ धावांची सलामी दिल्यावर हॅरिसला शार्दूलने बाद केले. तर पुढच्याच षटकात ऑफस्पिनर वॉशिंग्टन सुंदरने वॉर्नरला पायचीत पकडले. पहिल्या डावातील शतकवीर मार्नस लबूशेनने आक्रमक शैलीत फलंदाजी करत २२ चेंडूत २५ धावांची खेळी केल्यावर त्याला सिराजने बाद केले. सिराजनेच मॅथ्यू वेडला खातेही उघडू दिले नाही.

- Advertisement -

स्टिव्ह स्मिथचे अर्धशतक

स्टिव्ह स्मिथने एक बाजू लावून धरत ६७ चेंडूत त्याचे अर्धशतक झळकावले. मात्र, त्यालाही ५५ धावांवर सिराजने माघारी पाठवले. तर कॅमरुन ग्रीन (३७) आणि कर्णधार टीम पेन (२७) यांनी काही काळ चांगली फलंदाजी केल्यावर त्यांना शार्दूलने बाद केले. अखेर सिराजने मिचेल स्टार्क (१) आणि जॉश हेझलवूड (९) यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवत ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २९४ धावांवर संपवला. सिराजने या डावात ५ विकेट घेतल्या. या दौऱ्यात कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या सिराजची एका डावात पाच विकेट घेण्याची ही पहिली वेळ ठरली.


हेही वाचा – दुखापतींचे शुक्लकाष्ट!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -