घरक्रीडाऑस्ट्रेलियातील टी-२० वर्ल्डकप लांबणीवर?

ऑस्ट्रेलियातील टी-२० वर्ल्डकप लांबणीवर?

Subscribe

पुढील आठवड्यात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता

करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ऑस्ट्रेलियात होणारा टी-२० विश्वचषक पुढे ढकलण्यात येणार आहे. यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक होणार होता. मात्र, हा विश्वचषक लांबणीवर पडणार असून याबाबतची अधिकृत घोषणा पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. ही माहिती एका इंग्रजी वृत्तपत्राने दिली आहे. करोनामुळे आयपीएलचा यंदाचा मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. मात्र, आता टी-२० विश्वचषक पुढे ढकलण्यात आल्याने यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये बीसीसीआय आयपीएलचे आयोजन करु शकेल.

पुढील वर्षीच भारतात टी-२० विश्वचषक होणार आहे. त्यामुळे यंदा ऑस्ट्रेलियात होणारा टी-२० विश्वचषक पुढे ढकलण्याआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाला बराच विचार करावा लागत आहे. आता या टी-२० विश्वचषकाचे आयोजन कधी करायचे हा मोठा प्रश्न या दोन बोर्डांसमोर आहे. सध्या यासाठी तीन पर्याय असल्याची चर्चा आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये टी-२० विश्वचषकाचे आयोजन करण्यास तयार आहे. मात्र, यामुळे पुढील आयपीएलबाबत प्रश्न निर्माण होतील. सहसा आयपीएलच्या मोसमाला एप्रिलमध्ये सुरुवात होते. त्यामुळे खेळाडूंना दोन स्पर्धांमध्ये विश्रांतीसाठी पुरेसा वेळ मिळणार नाही.

- Advertisement -

दुसरा पर्याय म्हणजे बीसीसीआय क्रिकेट ऑस्ट्रेलियाला २०२१ टी-२० विश्वचषकाचे आयोजन करण्यासाठी परवानगी देऊ शकेल आणि या बदल्यात २०२२ मध्ये भारतात टी-२० विश्वचषक होईल. मात्र, तसे होण्याची शक्यता कमीच आहे, कारण यावर्षाअखेरीस भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा ठरल्याप्रमाणे व्हावा यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि बीसीसीआय मिळून प्रयत्न करत आहेत. भारत टी-२० विश्वचषकाच्या यजमानपदाची आदलाबदल करणार नाही असे म्हटले जात आहे. तिसरा आणि अखेरचा पर्याय म्हणजे २०२२ मध्ये टी-२० विश्वचषक ऑस्ट्रेलियात पार पडले. २०२२ मध्ये आयसीसीची इतर कोणतीही जागतिक स्पर्धा होणार नसल्याने सध्या तरी हा पर्याय सर्वांसाठी सोयीचा आहे.

ही चर्चा पुढेही होत पाहू शकेल. ऑस्ट्रेलियाच्या सीमा सप्टेंबरपर्यंत बंद आहेत. त्यातच सर्वांना क्वारंटाईनच्या नियमांचे पालन करावे लागत आहे. त्यामुळे १६ संघाचा सहभाग असलेली यावर्षीची टी-२० विश्वचषक स्पर्धा पुढे ढकलण्यात येणार हे जवळपास निश्चित असून याबाबतची अधिकृत घोषणा पुढील आठवड्यात होणे अपेक्षित आहे.

- Advertisement -

वर्ल्डकपसाठी तीन पर्याय

* क्रिकेट ऑस्ट्रेलिया फेब्रुवारी-मार्चमध्ये आयोजन करण्यास तयार
* २०२१ मध्ये ऑस्ट्रेलियात आणि २०२२ मध्ये भारतात टी-२० विश्वचषक
* २०२२ मध्ये टी-२० विश्वचषक ऑस्ट्रेलियात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -