घरक्रीडामीडिया आणि लोकांशी नीट वाग! विराटला सल्ला

मीडिया आणि लोकांशी नीट वाग! विराटला सल्ला

Subscribe

तुझं वर्तन हे भारतीय कर्णधारपदाला साजेसं असंच असायला हवं, असा सल्ला बीसीसीआयच्या समितीने त्यांनी विराटला दिला.

काही दिवसांपूर्वीच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने एका क्रिकेट चाहत्याला देश सोडून जाण्याचा सल्ला दिला होता. याप्रकरणी बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीनं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त करत ‘प्रसारमाध्यमं आणि लोकांशी संवाद साधताना नम्रतेनं वाग’, असा सल्ला बीसीसीआयने विराटला दिला आहे. भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून, २१ नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलिया विरोधात टी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयच्या समितीने विराटला हा सल्ला दिला आहे. ‘इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे फलंदाज अधिक चांगले खेळतात पण भारतीय फलंदाजीत काहीच विशेष नाही,’ असं वक्तव्य एका क्रिकेट प्रेमीने केलं होतं. त्याच्या या वक्तव्यावर विराट कोहलीचा संताप अनावर झाला आणि त्यानं त्या क्रिकेट चाहत्याला थेट देश सोडून जा असा सल्ला दिला. परदेशी खेळाडू आवडतात तर मग खुशाल देशाबाहेर जा, असं विराटने म्हटलं होत. याप्रकरणावरुन विराट कोहलीला सोशल मीडियावर खूपच ट्रोल करण्यात आलं होतं.

दरम्यान, बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीनंही विराटला याच मुद्द्यावरुन धारेवर धरल्याचं समजतंय. समितीतील काही  सदस्यांनी विराटशी फोनवरून चर्चा केली. आक्रमकपणा सोडून प्रसारमाध्यमं आणि लोकांशी संवाद साधताना नम्रतेनं वाग, अशी ताकीद त्यांनी विराटला दिला. याशिवाय तुझं वर्तन हे भारतीय कर्णधारपदाला साजेसं असंच असायला हवं, असा सल्लादेखील त्यांनी विराटला दिला. अद्याप विराट कोहलीने यावर काहीच प्रतिक्रिया दिली नसली, तरी बीसीसीयच्या समितीनं दिलेला हा सल्ला विराटने मनावर घेतला असल्याचं समजतंय. दुसरीकडे सध्या तमाम क्रिकेट प्रेमींचं लक्ष ऑस्ट्रेलियन दौऱ्यामधील भारतीय संघाट्या खेळीकडे लागून राहिलं आहे.

- Advertisement -

भारतीय संघ जिंकण्यासाठी सज्ज

ऑस्ट्रेलिया दौऱ्याला जाण्याअगोदर संघाचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी पत्रकार परिषद बोलवली होती. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जिंकू आणि मगच मायदेशी परतू असं विराट यावेळी म्हणाला होता. आम्ही आता जिंकण्यासाठी सज्ज झाले आहोत. शिवाय, सध्या आमच्याकडे गोलंदाज आक्रमक आहेत. त्यामुळे आता फलंदाजांवरही मोठी जबाबदारी आहे. आता प्रत्येकजण चांगले प्रदर्शन करण्यासाठी आणि चुका सुधारण्यासाठी सज्ज झाले आहेत, असंही विराट कोहली म्हणाला. आपला संघ जिंकावा यासाठी प्रत्येक खेळाडूने वैयक्तीक पातळीवर मेहनत घेऊन जबाबदारी बाळगायला हवी, असंही कोहली यावेळी म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -