घरIPL 2020IND vs AUS : कोहली एकच कसोटी खेळणार असल्याचे आश्चर्य - स्टिव्ह वॉ

IND vs AUS : कोहली एकच कसोटी खेळणार असल्याचे आश्चर्य – स्टिव्ह वॉ

Subscribe

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. 

भारताचा कर्णधार विराट कोहली ऑस्ट्रेलिया दौऱ्यात केवळ एकच कसोटी सामना खेळणार असल्याचे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह वॉला आश्चर्य वाटले. भारतीय संघ यावर्षाअखेरीस ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार असून तीन एकदिवसीय, तीन टी-२० आणि चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. खासकरून या दोन बलाढ्य संघांमधील कसोटी मालिकेची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, मालिका सुरू होणार त्याआधीच भारताची बाजू कमकुवत झाली आहे. कोहली पितृत्व रजेवर जाणार असून पहिल्या कसोटीनंतर मायदेशी परतणार आहे. विराट आणि पत्नी अनुष्का शर्मा या दाम्पत्याला जानेवारी २०२१ मध्ये अपत्यप्राप्ती होणार आहे.

कोहली तीन कसोटी सामन्यांना मुकणार असल्याचे मला दुःख आहे. त्याच्या या निर्णयाचे मला थोडे आश्चर्यही वाटले. त्याच्या कारकिर्दीतील ही सर्वात महत्त्वाच्या कसोटी मालिकांपैकी एक असणार आहे. कोहलीने आतापर्यंतच्या कारकिर्दीत खूप यश मिळवले आहे. अनेक विक्रम केले आहेत. या मालिकेला मात्र विशेष महत्त्व आहे. मात्र, तो कुटुंबाला प्राधान्य देत आहे. त्यामुळे त्याला अजिबातच दोष देता येणार नाही, असे वॉ म्हणाला.

- Advertisement -

कोहलीच्या नेतृत्वात भारताने मागील वर्षी पहिल्यांदा ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. मात्र, आता कर्णधाराच्या अनुपस्थितीत भारताला या कामगिरीची पुनरावृत्ती करणे अवघड जाणार आहे. याबाबत वॉने सांगितले, मागील वर्षी भारताने कसोटी मालिका जिंकली. या मालिकेत डेविड वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथ हे ऑस्ट्रेलियाचे प्रमुख खेळाडू खेळले नव्हते. मात्र, तुम्हाला सर्वोत्तम खेळाडूंविरुद्ध खेळून जिंकायचे असते. त्यामुळे कोहलीने चारही कसोटी सामने खेळले पाहिजे होते असेच ऑस्ट्रेलियाला वाटत असेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -