बुमराहला पुरेशी विश्रांती देणे आवश्यक!

प्रशिक्षक शास्त्रींचे उद्गार

Mumbai
Ravi Shashtri
रवी शास्त्री

भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहला सध्या पाठीच्या दुखापतीने सतावले आहे. त्यामुळे तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळू शकत नाही. बुमराह हा जगातील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून ओळखला जातो. त्याने क्रिकेटच्या तिन्ही (कसोटी, एकदिवसीय, टी-२०) प्रकारांत मागील काही वर्षांत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यामुळे तो भारतीय संघाचा महत्त्वाचा सदस्य असून त्याला पुरेशी विश्रांती देणे आवश्यक आहे, असे विधान भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केले.

बुमराह दुखापतग्रस्त असल्याने मला त्याची खूप काळजी वाटते. तो आमचा खूप महत्त्वाचा, खास, वेगळा आणि मॅच-विनर गोलंदाज आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याबाबत आम्ही विविध डॉक्टरांचे मत घेत आहोत. तो क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये खेळत असल्याने त्याला पुरेशी विश्रांती देणे आमच्यासाठी आवश्यक आहे, असे शास्त्री यांनी सांगितले.