घरक्रीडाइंग्लिश प्रीमियर लीग : चेल्सी, लिव्हरपूल अजूनही अपराजित

इंग्लिश प्रीमियर लीग : चेल्सी, लिव्हरपूल अजूनही अपराजित

Subscribe

इंग्लिश प्रीमियर लीगच्या २०१८-१९ मोसमाला चेल्सी आणि लिव्हरपूल यांनी अप्रतिम सुरूवात केली आहे. या मोसमात दोन्ही संघानी आपले पाचही सामने जिंकले आहेत.

इंग्लिश प्रीमियर लीग जिंकण्यासाठी गतविजेत्या मँचेस्टर सिटीसोबत चेल्सी आणि लिव्हरपूल या संघाना प्रबळ दावेदार मानले जात आहे. दोन्ही संघानी या मोसमाला अप्रतिम सुरूवात केली आहे. ते या मोसमातील पाचही सामने जिंकले आहेत. त्यामुळे दोन्ही संघांच्या खात्यात १५ गुण आहेत.

चेल्सीच्या विजयात हझार्डची चमक

कार्डिफ सिटी या संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात चेल्सीने ४-१ असा विजय मिळवला. या सामन्यात १६ व्या मिनिटाला सोल बाम्बाने हेडर मारत कार्डिफला १-० अशी आघाडी मिळवून दिली. पण यानंतर चेल्सीने अप्रतिम खेळ केला. ३७ व्या मिनिटाला चेल्सीचा स्टार खेळाडू इडन हझार्डने गोल करत सामन्यात १-१ अशी बरोबरी केली. मध्यंतरापूर्वी पुन्हा हझार्डनेच जिरूडच्या अप्रतिम पासवर गोल करत चेल्सीला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. तर ८० व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर गोल करत हझार्डने आपली हॅट्रिक पूर्ण केली. अखेर ८३ व्या मिनिटाला विलियानने अप्रतिम गोल करत चेल्सीला ४-१ असा विजय मिळवून दिला.

- Advertisement -

 

- Advertisement -

फर्मिंहो ठरला लिव्हरपूलचा मॅचविनर

इंग्लिश प्रीमियर लीगच्या महत्वाच्या सामन्यात लिव्हरपूलने टॉटनहॅमचा २-१ असा पराभव केला. या सामन्यात लिव्हरपूल संघाने चांगली सुरूवात केली. त्यांचे खेळाडू मोहमद सलाह आणि साडिओ माने यांना गोल करायची संधी होती. पण ते गोल करू शकले नाही. पण ३९ व्या मिनिटाला वाईनआल्डमने गोल करत लिव्हरपूलला सामन्यात आघाडी मिळवून दिली. तर ५४ व्या मिनिटाला रॉबर्टो फर्मिंहोने गोल करत लिव्हरपूलची आघाडी २-० अशी वाढवली. त्यानंतर टॉटनहॅमने सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडून एरीक लमेलाने गोल करून लिव्हरपूलची आघाडी कमी केली. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. त्यामुळे लिव्हरपूलने हा सामना २-१ असा जिंकला.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -