घरक्रीडासराव सामन्यात पाच फलंदाजांनी ठोकली अर्धशतके

सराव सामन्यात पाच फलंदाजांनी ठोकली अर्धशतके

Subscribe

भारत आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया इलेव्हनमध्ये सराव सामना सुरु आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका सुरु होण्यापूर्वी भारत आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया इलेव्हनमध्ये सराव सामना सुरु आहे. ४ दिवसीय सराव सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेला होता. तर सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताच्या पाच फलंदाजांनी अर्धशतके लगावली. त्यामुळे भारताने पहिल्या डावात ३५८ इतकी धावसंख्या उभारली.

पृथ्वीचे आक्रमक अर्धशतक 

या सामन्यात क्रिकेट ऑस्ट्रेलिया इलेव्हन नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारताचा सलामीवीर लोकेश राहुलचा खराब दौरा सुरूच राहिला. तो अवघ्या ३ धावांवर खराब फटका मारून बाद झाला. तर युवा पृथ्वी शॉने आक्रमक फलंदाजी करत ६९ चेंडूंत ६६ धावा केल्या. पण तो अगदी विचित्र पद्धतीने बाद झाला. लेगस्पिनर डॅनियल फॅलिन्सने त्याला बोल्ड केले.

पुजारा,कोहलीचीही चांगली फलंदाजी 

तर चेतेश्वर पुजारा (५४), कर्णधार विराट कोहली (६४), अजिंक्य रहाणे (५६), हनुमा विहारी (५३) यांनीही अर्धशतके लगावली. रोहित शर्माने ४० धावा केल्या. पण यानंतर रिषभ पंत, अश्विन, मोहम्मद शमी आणि उमेश यादव हे झटपट माघारी परतल्याने भारताचा डाव ३५८ धावांत संपुष्टात आला. क्रिकेट ऑस्ट्रेलिया इलेव्हनकडून अॅरॉन हार्डीने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. तर क्रिकेट ऑस्ट्रेलिया इलेव्हनची पहिल्या डावात बिनबाद २४ अशी धावसंख्या आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -