घरक्रीडाIPL 2020 : युएईतील उष्णता, सर्वात मोठे आव्हान - एबी डिव्हिलियर्स

IPL 2020 : युएईतील उष्णता, सर्वात मोठे आव्हान – एबी डिव्हिलियर्स

Subscribe

रात्रीही वातावरणात फारसा बदल होईल असे डिव्हिलियर्सला वाटत नाही.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, यंदा आयपीएल स्पर्धा भारताऐवजी युएईमध्ये होणार आहे. भारत आणि युएईतील खेळपट्ट्यांमध्ये बरेचसे साम्य असले, तरी दोन देशांमधील वातावरणात बराच फरक आहे. त्यामुळे युएईमधील उष्णतेशी जुळवून घेणे, या उष्णतेमध्ये खेळणे हे सर्व संघांसमोरील सर्वात मोठे आव्हान असणार आहे, असे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा खेळाडू एबी डिव्हिलियर्सला वाटते. या स्पर्धेतील बहुतांश सामने रात्रीच्या वेळी होणार आहेत. मात्र, रात्रीही वातावरणात फारसा बदल होईल असे डिव्हिलियर्सला वाटत नाही.

- Advertisement -

अशा वातावरणात खेळण्याची सवय नाही

अगदी खरे सांगायचे, तर मला अशा वातावरणात खेळण्याची सवय नाही. इतक्या उष्णतेत मी फारसा खेळलेलो नाही. या उष्णतेमुळे मला चेन्नईमध्ये जुलैच्या महिन्यात झालेल्या एका कसोटी सामन्याची आठवण होते. त्या सामन्यात विरेंद्र सेहवागने त्रिशतक केले होते. त्या सामन्याच्या वेळी जितके उष्ण वातावरण होते आणि जितका उकाडा होता, तो मी फारसा अनुभवलेला नसल्याचे डिव्हिलियर्स म्हणाला. इथे अगदी रात्री १० वाजताही खूप घाम येतो. मी जेव्हा युएईत दाखल झालो, तेव्हा येथील मागील काही महिन्यांचे वातावरण मी पाहिले होते. आता वातावरणात सुधारणा होत आहे. परंतु, अजूनही बरीच उष्णता आहे. सामन्यादरम्यान हे उष्ण वातावरण महत्त्वाची भूमिका बजावेल असे मला वाटते, असेही डिव्हिलियर्सने नमूद केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -