ICC Women’s T-20 World Cup : भारताने न्यूझीलंडला दिले १९५ धावांचे आव्हान

आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडला १९५ धावांचे आव्हान दिले आहे.

Mumbai
हरमनप्रीत कौर
आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकपच्या थरार आजपासून सुरु झाला आहे. वेस्ट इंडिजमध्ये होत असलेल्या या वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यात भारताचा सामना न्यूझीलंडविरुद्ध होत आहे. या सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

हरमनप्रीतचे तुफान शतक 

भारताच्या फलंदाजीची सुरुवात तितकीशी चांगली झाली नाही. भारताच्या सलामीवीर तानिया भाटिया (९) आणि स्म्रिती मानधना (२) या दोघी लवकर बाद झाल्या. तर हेमलथाही १५ धावा करून बाद झाली. पण यानंतर जेमिमा रोड्रिगेस आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी भारताचा डाव सावरला. दोघीनी दुसऱ्या विकेटसाठी १३४ धावांची भागीदारी केली. रोड्रिगेसने ४५ चेंडूंत ७ चौकारांसह ५९ धावांची खेळी केली. तर हरमनप्रीत कौरने तुफान फटकेबाजी करत ५१ चेंडूंत ७ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने १०३ धावा केल्या. त्यामुळे भारताने आपल्या २० षटकांत ५ बाद १९४ इतकी धावसंख्या गाठली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here