घरक्रीडाIndia vs England test : विराटचं जो रूटला जशास तसं उत्तर!

India vs England test : विराटचं जो रूटला जशास तसं उत्तर!

Subscribe

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या टेस्टमध्ये इंग्लंडचा कर्णधार रूटला बाद केल्यानंतर विराटने तसेच सेलिब्रेशन केले जसे रूटने एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर केले होते.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कोणत्याही सामन्यात यश मिळवल्यानंतर सेलिब्रेशन करण्याची खुन्नस तशी जुनीच. अगदी २००२ ला नेटवेस्ट सिरीज जिंकल्यानंतर दादा गांगुलीने टी-शर्ट काढून केलेले सेलिब्रेशन हे जसे फ्लिंटॉफच्या वानखेडेतील सेलिब्रेशनला चोख प्रत्युत्तर होते. तसेच काहीसे विराटनेही केले आहे. मागच्याच महिन्यात झालेल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत विजयानंतर इंग्लंडचा कर्णधार जो रूटने बॅट खाली टाकत सेलिब्रेशन केले. त्याचेच प्रत्युत्तर कालच्या सामन्यात कोहलीने दिले असून जेव्हा रूट आउट झाला, तेव्हा कोहलीने तशीच हवेतून बॅट खाली सोडण्याची अॅक्शन करत प्रत्युत्तर दिले.

रूटने केले होते असे सेलिब्रेशन

भारताचा इंग्लंड दौरा सध्या सुरू असून सर्वात आधी झालेल्या टी-२० मालिकेत भारताने विजय मिळवला. मात्र एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत मात्र भारताला ३-२ अशा फरकाने पराभव स्वीकारावा लागला. अखेरच्या सामन्या ८ विकेट्सच्या मोठ्या फरकाने इंग्लंडने भारतावर विजय मिळवला आणि तेव्हा बॅटिंग करत असलेल्या कर्णधार रूटने आपल्या हातातील बॅट हवेतूनच खाली टाकत आनंद व्यक्त केला.

- Advertisement -

कोहलीने असं दिलं उत्तर

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत पहिल्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रूट ८० धावांवर खेळत असतानाच कोहलीने अप्रतिम फिल्डिंग करत त्याला रनआउट केले आणि आपला त्याच जल्लोषात आनंद व्यक्त केला, जसा रूटने एकदिवसीय सामन्यांची मालिका जिंकल्यावर केला होता. कोहलीने रूटप्रमाणेच हवेतून बॅट खाली सोडण्याची अॅक्शन करत सेलिब्रेशन केले.

- Advertisement -


पहिल्या कसोटी सामन्यामध्ये इंग्लंड पहिल्या दिवसाअखेर २८५ वर ९ बाद या स्थितीवर आहे. दिवसाच्या शेवटी इंग्लंडकडून जेम्स अँडरसन ९ चेंडूंत ० धावांवर तर सॅम कुर्रान ६७ चेंडूंत २४ धावांवर खेळत आहेत. भारताकडून आश्विनने अप्रतिम बॉलिंग करत ४ विकेट घेतल्या, तर मोहम्मद शमीने २ आणि इशांत आणि उमेश यादवने प्रत्येकी १-१ विकेट घेतली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -