घरक्रीडाचेन्नईच्या सुपर किंग्जपुढे बंगळुरुचे चॅलेंजर्स फेल

चेन्नईच्या सुपर किंग्जपुढे बंगळुरुचे चॅलेंजर्स फेल

Subscribe

चेन्नईच्या सुपर फिरकीपटूंपुढे बंगळुरुचे चॅलेंजर्स फार काळ टिकले नाहीत. अवघ्या ७० धावांवर बंगळुरुला गाशा गुंडाळावा लागला. त्यामुळे चेन्नईसमोर ७१ धावांचे माफक आव्हान शिल्लक राहीले.

विराट कोहलीच्या चॅलेंजर्सने दिलेल्या माफक चॅलेंजला गुंडाळून चेन्नईने आयपीएलच्या शनिवारपासून सुरु झालेल्या १२ व्या सीझनला विजयाची सलामी दिली. चेन्नईने ७ गडी राखत विजयाचा झेंडा फडकवला. बंगळुरूने दिलेलं ७१ धावांचे लक्ष्य चेन्नईने सहज पूर्ण केलं. यामध्ये शेन वॉटसन आणि सुरेश रैना यांना माघारी पाठवण्यात बंगळुरूच्या गोलंदाजांना यश आलं. मात्र, अंबाती रायडू, केदार जाधव आणि रविंद्र जडेजा यांनी शांतपणे फलंदाजी करत विजय खिशात गुंडाळला.

अवघ्या ७० धावांवर बंगळुरुने गाशा गुंडाळला

आजपासून आयपीएल सामन्याला सुरुवात झाली आहे. आजची पहिली लढत ही चेन्नई सुपर किंग्झ आणि रॉयल चॅलेंजर्स बॅंग्लोर यांच्यात होती. या सामन्यात चेन्नईने टॉस जिंकला आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईच्या सुपर फिरकीपटूंपुढे बंगळुरुचे रॉयल चॅलेंजर्स म्हणून ओळख असणारे फलंदाज फार काळ टीकले नाहीत. बंगळुरुचा वाघ विराट कोहली अवघ्या ६ धावांवर बाद झाला. कोहलीच्या नंतर एक-एक करुन सगळेच चॅलेंजर्स तंबूत शिरले. हार्दिक पटेल वगळता एकही खेळाडूला १० धावांपेक्षा जास्त धावा करु शकला नाही. अखेर बंगळुरुचे सर्व गडी ७० धावांवर बाद झाले.

- Advertisement -

चेन्नईच्या सुपर फलंदाजांची कामगिरी

चेन्नईचे फलंदाज आपल्या नावाप्रमाणे सुपर ठरले. हरभजन सिंह आणि इमरान ताहीर यांनी प्रत्येकी ३ विकेट बळी घेतले. तर रविंद्र जडेजाने २ बळी घेतले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -