घरक्रीडाविश्वचषक नेमबाजी २०१९ : भारताची तीन सुवर्णपदकांची कमाई

विश्वचषक नेमबाजी २०१९ : भारताची तीन सुवर्णपदकांची कमाई

Subscribe

दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मनू भाकरच्या यशाचे कौतुक केले आहे.

सध्या चीनमध्ये विश्वचषक नेमबाजी स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत भारताच्या तीन नेमबाजांनी आज सुवर्ण कामगिरी केली आहे. भारताची युवा नेमबाज मनू भाकर, एलावेनील वेलारिवन आणि दिव्यांश सिंग पानवर या तिघांनी आज सुवर्णपदक पटकावले. महिलांच्या १० मीटर एअर पिस्टलमध्ये मनू भाकरने तर वेलारिवनने १० मीटर्स एअर रायफलमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. तर नेमबाज दिव्यांश सिंग पानवरने १० मीटर्स एअर रायफलमध्ये सुवर्ण कामगिरी केली. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मनू भाकरच्या यशाचे कौतुक केले आहे.

- Advertisement -

महिलांची १० मीटर एअर पिस्टर स्पर्धा

चीनमध्ये सुरु असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या मून भाकरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्टल प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे. यामध्ये २४४ पूर्णांक ७ दशांश गुण मिळवत तिने अव्वल स्थान पटकावले. तर सर्बियाच्या झोरान अरुनोविचनं २४१.९ गुण मिळवत रौप्य तर चीनच्या क्वियान वँगनं २२१.८ गुणांसह कांस्य पदकाची कमाई केली आहे. या स्पर्धेत भारताच्या यशस्विनी सिंग देसवालला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे.

- Advertisement -

पुरुषांची १० मीटर एअर पिस्टल स्पर्धा

चीनमध्ये सुरु असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्टल प्रकारात नेमबाज अभिषेक वर्माने ५८८ गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. तर नेमबाज सौरभ चौधरीला ५८१ गुणांसह सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

जसपाल राणा यांचे मार्गदर्शन

आंतरराष्ट्रीय शुटींग स्पोर्ट फेडरेशनच्या (आयएसएसएफ) या वार्षिक स्पर्धेत रायफल आणि पिस्तुल नेमबाजी प्रकारात जगातील विविध देशांचे अव्वल नेमबाज सहभागी झाले आहेत. या स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय नेमबाज संघाला जसपाल राणा यांचे मार्गदर्शन मिळत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -